Breaking

रविवार, ९ जुलै, २०२३

छत्रपती वाइल्ड लाईफ फाउंडेशन आणि डॉ. जे जे मगदुम आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केली सिद्धोबा देवराई येथे स्वच्छ्ता

 



✍🏼 मालोजीराव माने, कार्यकारी संपादक 

        आळते : ज्या निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे त्या निसर्गाचे आपण काहीतरी देणं लागतो, हा संदेश देत डॉ. जे जे मगदुम आयुर्वेद मेडिकल कॉलेज, जयसिंगपूर च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती वाइल्ड लाईफ फाउंडेशन,कोल्हापूर आणि वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धोबा देवराई, आळते येथे स्वच्छ्ता मोहीम राबवली. 



     यामध्ये BAMS चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी स्वच्छ्ता मोहिमेत सहभागी झाले होते. यांना मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती वाइल्ड लाईफ फाउंडेशन चे सदस्य अक्षय मगदूम, पत्रकार मालोजीराव माने, वनरक्षक एम. पवार उपस्थित होते. 

    यावेळी विद्यार्थ्यांनी पाच पोती प्लास्टिक कचरा गोळा केला. 


     सिमेंटच्या जंगलात गाड्यांचा धुर खाऊन गुदमरलेला माणूस आनंद शोधण्यासाठी निसर्गाचा सहारा घेतो. तो निसर्गात जातो पण सोबत घानही करतो. डोळ्यासमोर विनाश दिसत असूनही मानव जागा होत नाहीये हे दुर्दैव आहे. 

       - मालोजीराव माने, पत्रकार


ट्रेकिंग करा, जंगल फिरा पण त्या निसर्गाची काळजी देखील जरूर घ्या. ज्या प्लास्टिक वस्तू आपण जंगलात घेऊन जातो त्या सर्व वस्तू परत आणणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच अजाणतेपणी ज्यांनी हा कचरा केला आहे तो स्वच्छ करावा तसेच त्यांचे प्रबोधन करणे देखील गरजेचे आहे.

        अक्षय मगदूम, सदस्य छत्रपती वाइल्ड लाईफ फाउंडेशन.

 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा