![]() |
डॉ. चिघळीकर यांना निवडीचं पत्र प्रदान करताना कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, डायरेक्टर डॉ. पी.टी.गायकवाड व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विद्यार्थी कल्याण मंडळ अर्थात (Board of Students Development) करिता मा. कुलगुरू प्रा.डॉ. डी. टी. शिर्के यांनी कार्यशील प्रा.डॉ. डी.जी.चिघळीकर (कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गडहिंग्लज) यांचे सदस्य नामनिर्देशन (Nomination) केले आहे. सदर नामनिर्देशनाचे पत्र प्र. कुलसचिव प्रा.डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे हस्ते डॉ.चिघळीकर यांना प्रदान केले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थी विकास कार्याचा गौरव उद्गार काढून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास कक्ष संचालक डॉ. पी. टी. गायकवाड, व्यवस्थापन परिषद सदस्य मा. सिद्धार्थ शिंदे सर हे मान्यवर उपस्थित होते.
ओंकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. राजनदादा पेडणेकर आणि प्र.प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी अभिनंदन केले.
डॉ. चिघळीकर सामाजिक व शैक्षणिक चळवळीचे आघाडीचे व बिनीचे शिलेदार म्हणून ती कार्यरत आहेत. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी व सामाजिक संवेदनशील व्यक्ती म्हणून ते परिचयाचे आहेत. विद्यार्थी घटकाला केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. चिघळीकर यांनी यापुर्वी ९ वर्षे राष्ट्रीय सेवा योजना कोल्हापूर जिल्हा समन्वयकाच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता, बंधुतेसाठी ते सातत्याने झटत असतात. ५ वर्षे कोल्हापूर जिल्हा सांस्कृतिक समन्वयक म्हणुन उत्कृष्ट काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या "नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन/संरक्षण व पाणी बचत" अभियानाचे कोल्हापूर जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम करत आहेत. शैक्षणिक पातळीवर अध्ययन व अध्यापनातील हातोटी, कार्यशील नेतृत्व व उत्तम वक्तृत्व याच्या जोरावर त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आपला व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला आहे.
शैक्षणिक क्षेत्रात विविध पदाच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे. सध्या ते शिवाजी विद्यापीठाच्या व्यावसायिक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. त्यांच्या या नामनिर्देशानाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ते कटिबद्ध राहणार याबाबत तीळ मात्र शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा