Breaking

बुधवार, २६ जुलै, २०२३

*राजमाता जिजाऊ युवती स्व-रक्षण प्रशिक्षण कार्यशाळा मुलींच्या संरक्षणाला बळ देणारे : पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले यांचे प्रतिपादन*


मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्नेहल टकले, अध्यक्षस्थानी प्रा.आप्पासाहेब भगाटे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर  :  प्रत्येक युवतीने जागृत होणे आवश्यक असून अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून मानसिक व शारीरिक बळ प्राप्त होत असते असे मत पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्नेहल टकले यांनी जयसिंगपूर येथील राजमाता जिजाऊ युवती स्व-रक्षण प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. आप्पासाहेब भगाटे, प्रमुख पाहुणे प्राचार्य प्रा.डॉ.भरत पाटील आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व कपिल माने उपस्थित होते.

     याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीमती टकले म्हणाल्या, सद्य परिस्थितीत कॉलेज युवतीनी जागृत होणं आवश्यक असून आई-वडिलांच्या दिलेल्या संस्काराचे उचित पालन करणे अपेक्षित आहे.तसेच पोलीस ठाण्याच्या माध्यमातून निर्भया पथकाच्या माध्यमातून मुलींना संरक्षण दिलं जाते. या प्रसंगी पोक्सो कायदा माहिती, भारतीय दंड विधान 376,354,498 कलमांची माहिती त्यांनी सांगितले. सद्य परिस्थितीत युवती विषयी घडणाऱ्या सायबर क्राईम बाबत  मुलींना जागृत करण्याचा प्रयत्न केला.

      समुपदेशक प्राचार्य डॉ. भरत पाटील यांनी स्त्री सुरक्षा, महिला विषयक कायदे , स्त्री-पुरुष समानता याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी घरेलू हिंसाचार, लिंग आधारित हिंसा व बालकामगार मुक्ती अशा अनेक बाबी विषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

      अध्यक्ष स्थानावर बोलताना संस्था पदाधिकारी प्रा. अप्पासाहेब भगाटे म्हणाले, महिलांचे सबलीकरण करण्यासाठी अशा प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. यासाठी त्यांनी महिला तक्रारीचे उत्तम पद्धतीने निवारण होणे गरजेचे आहे. त्यांनी महिला स्वसंरक्षण, समाज व्यवस्था व स्त्री-पुरुष भेद यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. व्यवहारातील काही ज्वलंत उदाहरण देऊन महिला सबलीकरणासाठी प्रशिक्षणाचे महत्त्व सांगितले.

      मान्यवरांचे स्वागत तक्रार निवारण समिती प्रमुख डॉ.सौ.एस.जी.संसुद्धी यांनी केले. डॉ.सौ.व्ही.व्ही.चौगुले यांनी प्रास्ताविक केले. डॉ.सौ.एस.एस.महाजन यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

        या कार्यक्रमाचे आभार प्रा.सौ.एस.जी.पाटील यांनी मानले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस.आर.नकाते यांनी केले.

     सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शिरोळ पंचायत समितीचे श्री.कपिल माने व तक्रार निवारण समितीच्या सर्व सदस्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा