Breaking

शनिवार, १५ जुलै, २०२३

*जयसिंगपुरातील महिलेचे मंगळसूत्र लंपास करणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश*


संशयित आरोपी अब्बास इराणी


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर :  शहरातील तिसऱ्या गल्लीतील जैन श्वेताबर मंदिरातून देवदर्शनाहून घरी परत येत असताना  दुचाकीवरुन आलेल्या अब्बास उर्फ टायगर मुनीर ईराणी (वय वर्ष २४ रा. गल्ली नं ०७, ईराणी मस्जिद राजीव गांधीनगर जयसिंगपूर) या संशयित चोरट्यास पकडण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश मिळाले.

     अधिकृत सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे १ एक लाख ६५ हजार,किंमतीचे मनीमंगळसुत्र हिजडा मारून चोरून नेले होते. मात्र जयसिंगपूर पोलीस यंत्रणेच्या सतर्कतेमुळे व गोपनीय माहितीच्या आधारावर सदर संशयित चोरट्यास पकडण्यात आले.पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  कॉन्स्टेबल रोहित डावाळे व सागर सूर्यवंशी यांना पाठवून सदर गुन्हयामध्ये अटक करुन त्याचेकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेला १,६५,०००/- किंमतीचे मंगळसुत्र तसेच गुन्हा रजिस्टर नंबर  २४४ / २०२३ भारतीय कलम  ३७९ प्रमाणे गुन्हयातील एक मोटारसायकल जप्त केली.

   सौ. कल्पना विनोद पोरवाल (वय ४५, रा. पुष्पकला बिल्डींग, गल्ली नं.१ जयसिंगपूर) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी  चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

     जयसिंगपूर पोलिसांच्या या यशस्वी  कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा