![]() |
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना प्रा. तोहिद मुजावर |
*शुभम हतळगे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : येथील स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्यावतीने दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा १ जुलै रोजी जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉल रोटरी क्लब येथे संपन्न झाला.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रख्यात प्लेसमेंट ऑफिसर, प्रतिष्ठीत करिअर कौन्सिलर व आदर्श शिक्षण समुह विटाचे संचालक मा.प्रा. तौहीद मुजावर उपस्थित होते. यावेळी प्रा. मुजावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, दहावी व बारावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत त्यांनी नाराज न होता यापेक्षा अधिक मेहनत घेऊन पुढील शिक्षणासाठी सज्ज रहावे असे सांगून त्यांनी दहावी, बारावी नंतर काय करावे याचे सखोल मार्गदर्शन केले.तसेच गव्हर्मेंट व प्रायव्हेट सेक्टरमधील नोकरीसंबंधी व मार्केटप्रमाणे ट्रेडची निवड कशी करावी याबाबतही उत्तम मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास प्रसिध्द धन्वंतरी डॉ. निखिल पाटील, उद्योजक राजू मगदूम, माजी नगरसेवक सागर आडगाणे, प्रा.डॉ. प्रभाकर माने, जिनिअस क्लासेसचे प्रमुख प्रा. विनायक रजपूत, मा.संजय भोसले, मा.यासीन बागवान यांच्यासह प्रमुख मान्यवर व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.एजाज मुजावर, उपाध्यक्ष सुरेश राठोड, रवी सावंत व सर्व पदाधिकार्यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत संस्थापक अध्यक्ष एजाज मुजावर यांनी केले तर प्रास्ताविक रवी सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ.प्रभाकर माने यांनी केले. उत्तम सुत्रसंचालन श्री. व सौ. गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांनी या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सदरचा कार्यक्रम प्रेरणादायी व पुढील शैक्षणिक वाटचालीस दिशादर्शक असल्याबाबतचे मत सर्व घटकांकडून व्यक्त करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा