![]() |
अभिभाषण करताना प्राचार्य प्रा.डॉ.सुरत मांजरे |
*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर: अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामती संचलित, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये कनिष्ठ विभागातील आर्ट्स व कॉमर्स विभागात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून माननीय प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचे अभिभाषण संपन्न झाले. या प्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील कार्यक्रमाची सर्वसाधारण रूपरेषा व महाविद्यालयाचे नियम व अटी यांची परिपूर्ण अशी माहिती दिली. तसेच महाविद्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग घ्यावा व महाविद्यालयातील सर्व सुविधांचा वापर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी करून घ्यावा असे सुचित केले. याप्रसंगी त्यांनी अटल लॅब, बोटॅनिकल गार्डन, इन डोअरस्टेडियम, स्विमिंग टॅंक व जिम तसेच ग्रंथालय या सुविधा बाबत सविस्तर माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या साठी ड्रेस कोड चे महत्व विशद केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक डॉ. महावीर बुरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री बाळगोंडा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री सुनील चौगुले यांनी केले. याप्रसंगी ज्युनिअर विभागातील सकाळ सत्रातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा