![]() |
मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक मा.संदीप कोळेकर, प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, प्राचार्य डॉ.भरत पाटील व डॉ.एस.जी. संसुद्धी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : सक्षम राष्ट्र व समाज निर्मिती आणि स्व-रक्षणासाठी विद्यार्थिनींनी स्व-रक्षणीय कौशल्ये आत्मसात करून धाडसाने पुढे येणे गरजेचे असल्याचे मत पोलीस निरीक्षक मा.संदीप कोळेकर यांनी जयसिंगपूर कॉलेज येथे 'राजमाता जिजाऊ युवती स्वरक्षण प्रशिक्षणाच्या' समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
महाराष्ट्र शासनाच्या राजमाता जिजाबाई युवती स्व-संरक्षण कार्यक्रमात्तंर्गत जयसिंगपूर महाविद्यालयात युवतींवर होणारा अन्याय-अत्याचार व हल्ले थांबविण्यासाठी व त्यांना सक्षम बनविण्यासाठी 'जिल्हा महिला व बाल विकास अंतर्गत' शिरोळ पंचायत समितीच्या वतीने स्व-रक्षणासाठी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
मा.संदिप कोळेकर म्हणाले, कायदे अत्यंत क्लिष्ट असून आपणास कायद्याचे तंतोतंत पालन करावे लागते. घटनेतील कलम २५ नुसार स्व-रक्षणाचा अधिकार प्राप्त आहे. त्यामुळे उत्तम व सुरक्षित जीवन जगण्यासाठी अन्यायाच्या विरुद्ध दंड थोपटण्याचे बळ अशा प्रशिक्षण कार्यक्रमामुळे मिळत असल्याबाबतचे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी मोबाईलचा योग्य वापर करावे मात्र अतिरिक्त वापर टाळण्याबाबतचे ही मत व्यक्त केलं.
एन.डी.पाटील नाईट कॉलेज, सांगलीचे प्राचार्य प्रा.डॉ. भरत पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थिनींनी नितीन मूल्यांचे पालन करून स्वतःची ओळख निर्माण करावी. या संदर्भात त्यांनी उदबोधित करताना महिला व मुलीवर होणाऱ्या हिंसाचाराचे अनेक प्रकार ,कौटुंबिक हिंसासार कायदा,महिला आयोग यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले.
यावेळी पंचायत समितीचे अधिकारी मा.कैलास माने यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी कु. हिने प्रशिक्षणाविषयीक अनुभव मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केले.
अध्यक्षीय भाष्य करताना प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे म्हणाले, प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळालेल्या कौशल्याचा वापर करून जीवन सुकर करण्यासाठी त्याचा योग्य वापर करावा. तसेच आत्मसात केलेल्या कौशल्याचा सातत्याने सराव करून पुढील घटकांसाठी त्याचा लाभ व्हावा म्हणून अशा प्रकारचे प्रशिक्षण इतर विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.सौ. व्ही. व्ही. चौगुले यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.सौ. सुपर्णा संसुद्धी व उत्तम सूत्रसंचालन डॉ.सौ.एस.एस.नकाते यांनी केले.
या कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी युवती व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन IQAC व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा