Breaking

रविवार, २३ जुलै, २०२३

*श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न*


श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दक्षिण द्वार सोहळा संपन्न


*प्रा.चिदानंद अळोळी: नृसिंहवाडी प्रतिनिधी*


      *दक्षिणद्वार सोहळा, दत्त भक्तांना एक पर्वणी*

श्री क्षेत्र नृसिंहवाडी : येथे पावसाचा जोर धरलेने कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असलेने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरात आज रविवार दि.23/07/23 रोजी रोजी दुपारी 1.00 वाजता चालू सालातील पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.पावसाची संततधार व जोर जास्त असल्याने  कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

       येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेस वाहते. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्याने मुख्य मंदिराच्या उत्तर द्वारातून कृष्णा नदीचे पाणी मुख्य गाभार्‍यात प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या दक्षिण द्वारातून बाहेर पडते यालाच दक्षिणद्वार सोहळा असे म्हटले जाते.यावेळी मुख्य मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे पुण्यकारक मानले जाते.तसेच या सोहळ्यात स्नान केलेने मानवाच्या पापाचा ऱ्हास  होऊन पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची व संपूर्ण दत्तभक्तांची धारणा व विश्वास असल्याने या सोहळ्यात स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात.


   महाराष्ट्र ,कर्नाटक,आंध्रप्रदेश व गोवा या राज्यातील लाखो दत्तभक्त हे प्रत्येक वर्षी नृसिंहवाडीत  दर्शनासाठी येत असतात . त्याचप्रमाणे या दक्षिणद्वार सोहळ्यात स्नान करण्याचा लाभ भाविक घेत असतात .त्यातच अधिक मास व रविवार असलेने भाविकांची स्नानासाठी खूपच गर्दी होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा