Breaking

गुरुवार, २७ जुलै, २०२३

शनिवारी समाजवादी प्रबोधिनीत मणिपूर प्रश्नावर चर्चासत्र


समाजवादी प्रबोधिनीत व्याख्यानाचे आयोजन


  *भोलू शर्मा  : विशेष प्रतिनिधी*


इचलकरंजी :  समाजवादी प्रबोधिनी आणि श्रमशक्ती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ' मणिपूर प्रश्नाचे वास्तव ' या सध्याच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नावर'जाहीर चर्चासत्र ' आयोजित केले आहे. 

या चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून मा.प्राचार्य आनंद मेणसे (बेळगाव )हे मांडणी करणार आहेत. तर  सहवक्ते मा.गिरीश फोंडे ( कोल्हापूर) हे आहेत. हे चर्चासत्र समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात शनिवार ता. २९ जुलै २०२३ ,दुपारी ३ ते ५ यावेळी होणार आहे.तरी

     या चर्चासत्रात सर्व जिज्ञासू नागरिक बंधू भगिनीनी सहभागी व्हावे असे आवाहन समाजवादी प्रबोधिनी आणि श्रमशक्ती परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा