![]() |
शिवाजी विद्यापीठात युवा संवाद भारत कार्यक्रम |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनाच्या कक्षाच्या माध्यमातून ( India's Panch Pran A Youth Dialogue - Bharat Ke - Panch Pran – Ek Yuva Paricharcha' ) यावर आधारीत 'युवा संवाद' कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून वेळोवेळी विविध विद्यार्थीकेंद्रीत समाजाभिमूख कार्यक्रम, रचनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते असते. याच धर्तीवर विद्यापीठाच्या वतीने दिनांक 3 ऑगस्ट, 2023 रोजी विद्यापीठाशी संलग्न कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हयातील साधारणतः 500 विद्यार्थी स्वयंसेवक, स्वयंसेविका यांचे सहभागाने व मा. उच्च व तंत्रशिक्षण, मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य तसेच विविध सन्माननीय खासदार व आमदार आणि मा. कुलगुरूसों यांचे प्रमुख उपस्थितीत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील वि. स. खांडेकर भाषा भवन सभागृह येथे सकाळी 9 वाजलेपासून "युवा संवाद" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर "युवा संवाद" कार्यक्रमामधील सहभागास अनुसरून आपल्या महाविद्यालय / अधिविभाग येथील राष्ट्रीय सेवा योजनाचे 5 विद्यार्थी स्वयंसेवक आणि 5 विद्यार्थीनी स्वयंसेविका यांना दिनांक 3 ऑगस्ट, 2023 रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे वरीलप्रमाणे नमूद कार्यक्रमस्थळी पाठविणेत यावे असे आवाहन शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.डॉ. टी. एम. चौगले यांनी केले.
टिप :
1. कोल्हापूर जिल्हयातील संभाव्य पूरपरिस्थिती व अतिवृष्टी विचारात घेवून दिनांक 27 जुलै, 2023- - रोजीचा कार्यक्रम वरीलप्रमाणे नमूद दिनांक 3 ऑगस्ट, 2023 या तारखेस आयोजित करणेत येणार आहे.
2. नावनोंदणीकरीता लिंक (यापूर्वी नोंदणी केलेली असल्यास पुनश्चः नावनोंदणी आवश्यक नाही) https://forms.gle/EPfvwBHUBPxYR1aj8
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा