*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर : Kolhapur OFROH च्या वतीने आज बुधवार दि.9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन व ऑगस्ट क्रांती दिन मिरजकर तिकटी येथील विजय स्तंभाला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.
यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष मा.राजेश सोनपरोते या दिनाच्या औचित्य साधून मार्गदर्शन करताना म्हणाले, मुळात आदिवासी समाज हा असंघटित असल्याने तो एकत्रित येऊ शकला नाही. मात्र संघटनेच्या माध्यमातून समाज बांधव आपल्या न्याय व हक्काच्या विविध मागण्यांसाठी एकत्रित येत असल्याने समाज बळकट होण्याच्या दिशेने प्रवास सुरू आहे.
ते पुढे म्हणाले, जगातील सर्व देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात. त्यांची भाषा, संस्कृती, सण-उत्सव, चालीरीती, पेहराव या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडता आलेले नाही. वेळोवेळी त्यांची संख्याही कमी होत असल्याचे अहवालात दिसून आले आहे. आदिवासींना आपले अस्तित्व, संस्कृती आणि सन्मान वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. या जमातीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, त्यांची संस्कृती आणि आदर जतन करण्यासाठी सन १९९४ पासून ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष श्री नरेंद्र पराते, जिल्हा सचिव मा.रवींद्र हेडाऊ, जिल्हा कार्याध्यक्ष श्री सतीश नंदनवार, कोषाध्यक्ष श्री महेन्द्र गोलाईत, रमेश वरूडकर, श्री मुरली बारापात्रे, श्री धनराज निखारे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा