![]() |
मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमात शपथ ग्रहण करताना |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : "मेरी माटी मेरा देश " अर्थात " माझी माती माझा देश " अभियाना अंतर्गत प्राचार्य डॉ. सुरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली एन. सी.सी. कॅडेट्स व एन.एस.एसचे स्वयंसेवक विद्यार्थी व कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण केली.
महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांचेकडील पत्रानुसार "मेरी माटी मेरा देश " अर्थात " माझी माती माझा देश " अभियाना अंतर्गत शपथ घेणेबाबत पत्र प्राप्त झाले होते.
शासन पत्रान्वये दिलेल्या सुचनेनुसार दि. ०९ ऑगष्ट २०२३ रोजी सकाळी १०.०० वा सुरुवातीस प्राचार्य डॉ.मांजरे यांनी या कार्यक्रमाच्या हेतू स्पष्ट करून विद्यार्थ्यांना संबोधित केले.मा. प्राचार्य डॉ. सुरज मांजरे यांच्या उपस्थितीत एनसीसी ऑफिसर प्रा.बाळगोंडा पाटील यांनी एन. सी.सी. कॅडेट्स, एन.एस.एसचे स्वयंसेवक विद्यार्थी व कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शपथ दिली.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी मेरी मिट्टी मेरा देश, भारत माता की जय व अन्य स्वरूपाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. बाळगोंडा पाटील, एन .एस. एस.कार्यक्रम अधिकारी डॉ.के.डी. खळदकर यांनी उत्तम पद्धती केले. सदर कार्यक्रमास प्रा. सुरज चौगुले, प्रा. माधुरी कोळी तसेच अन्य प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा