Breaking

बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयांमध्ये तहसीलदार बाई माने यांनी युवकांशी साधला संवाद


हसूल सप्ताह निमित्त युवकांशी संवाद साधताना तहसीलदार सौ. बाई माने, प्राचार्य प्रा.डॉ. शिवाजीराव भोसले व अन्य मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


  आटपाडी : दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयांमध्ये तहसील कार्यालय आटपाडी यांच्या सहकार्याने महसूल सप्ताह अंतर्गत युवा संवाद हा कार्यक्रम संपन्न झाला. 

   या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आटपाडीच्या तहसीलदार श्रीमती बाई माने यांनी युवा संवाद कार्यक्रमाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातून मिळणाऱ्या दाखले विषयी तसेच हे दाखले काढताना येणाऱ्या अडचणी व हे दाखले कसे काढावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.  

  अध्यक्षीय स्थानावरून बोलताना प्राचार्य प्रा.डॉ. शिवाजीराव भोसले म्हणाले, विद्यार्थ्यांनी या युवा संवाद कार्यक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच आपल्याला लागणारे सर्व दाखले  काढून घ्यावेत जेणेकरून भविष्यातील आपला त्रास कमी होईल व आपल्याला सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळेल असे मत मांडले.

       या कार्यक्रमांमध्ये बारावीनंतर करिअरच्या संधी याविषयी डॉ. उत्तम मोटे यांनी महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले तसेच मंडल अधिकारी संतोष बोंगाळे यांनी ई पिक पाहणी व शेतकरी दाखला याविषयी मार्गदर्शन केले श्री पांडुरंग नाईकनवरे यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय शिष्यवृत्ती व त्यासाठी लागणारी कागदपत्रे याविषयी संपूर्ण माहिती दिली. 

      या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ज्युनिअर विभाग प्रमुख संताजी लोखंडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. हणमंत सावंत आणि आभार प्रा. आबासाहेब  जाधव यांनी मांडले. या कार्यक्रमाला  प्रा. शहाजी पारसे  प्रा. संजय बाबर प्रा. दत्तात्रय टकले, सौ.बाबर मॅडम सौ. जाधव मॅडम सौ कुंभार मॅडम तसेच प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा