![]() |
उद्बोधनात्मक अभिभाषण देताना प्राचार्य डॉ.सुरत मांजरे |
*प्रा डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर. : अनेकांत एज्युकेशन सोसायटी बारामती संचलित, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये सीनियर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे यांqचे यांनी उद्भोधनात्मक अभिभाषण केले.
प्राचार्य प्रा.डॉ.मांजरे या उद्बोधनात्मक अभिभाषणात म्हणाले, विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व भौतिक सुविधांचा उपयोग स्वतःच्या शैक्षणिक प्रगती व सर्वांगीण विकासासाठी केला पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर कॉलेज हे शैक्षणिक बलस्थाने व सर्व भौतिक सोयी सुविधांनी अव्वल स्थानी असणाऱ्या पैकी एक आहे. वर्षभर कॉलेजमध्ये विविध समितींच्या माध्यमातून विद्यार्थी विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असतात.तरी विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात आपला सक्रिय सहभाग नोंदविला पाहिजे. कला वाणिज्य, विज्ञान या परंपरागत शाखेबरोबर संगणक शास्त्र आणि बिव्होक सारख्या व्होकेशनल कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचा प्रयत्न केला जात असतो. उत्तम पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी घडविण्यात आले आहेत या. केंद्राचाही लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.
विविध विद्यार्थी विकासात्मक समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न होत असतो. एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजना या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, बहुश्रुत व्यक्तिमत्व, संवेदनशील व राष्ट्रीय करिअर घडवण्यात येत असते.
विद्यार्थ्यांचा संशोधनात्मक विकास व्हावा यासाठी कॉलेजमधील सर्व शाखेचे विभाग सक्षम असून प्राध्यापकवृंद परिपूर्ण आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू घडविण्यासाठी सर्व भौतिक सुविधा कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत.
प्राचार्य डॉ. मांजरे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करून स्वतःमध्ये बदल करणे काळाची गरज आहे. यासाठी आमचं महाविद्यालय कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ साठीचा सर्वसाधारण शैक्षणिक आराखडा विद्यार्थ्यांच्या समोर मांडला. सरते शेवटी त्यांनी कॉलेजमधील नियम व अटी यांची परिपूर्ण माहिती देत विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी अटल लॅब, बोटॅनिकल गार्डन, इन डोअर स्टेडियम, स्विमिंग टॅंक व जिम तसेच ग्रंथालय या सुविधा बाबत सविस्तर माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांच्या साठी ड्रेस कोड चे महत्व विशद केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रतिभावंत कवी कालवश महानोर यांच्या स्मृतीला उजाळा व अभिवादन करण्यासाठी स्तब्धता पाळण्यात आली.या नंतर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.एल.कदम यांनी केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ.एम.व्ही.काळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ.टी.जी.घाटगे, प्रा.आर.डी.तासगावकर त्याचबरोबर सीनियर कॉलेजमधील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा