Breaking

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

 

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


 कोल्हापूर : गणेशोत्सव काळात साऊंड सिस्टिम व लेझरचा वापर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळाचे पदाधिकारी, साऊंड सिस्टिम, चालक-मालक, ट्रॅक्टर मालकांवर गुन्हे दाखल करून यंत्रणा जप्त केली जाईल असा इशारा पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडित यांनी दिला.

    अलंकार हॉलमध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कोल्हापुरातील ध्वनियंत्रणा चालक-मालक, जनरेटरधारक, वाहनधारकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उदय माने यांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनियंत्रणांचे मानवी शरीरावर होणारे अजित टिके यांनी मंडळे, वाहनधारक, ध्वनियंत्रणा चालक- मालक, स्ट्रक्चरवाले यांच्यासाठी कोणती नियमावली आहे याची माहिती दिली.

        आजपर्यंत पोलिसांनी प्रबोधन केले. मात्र बऱ्याच मंडळांचे पदाधिकारी ऐकून सोडून देतात. त्यामुळे आता पोलिसांकडून अशा मंडळांवर गुन्हे दाखल केले जातील, त्यांना यंत्रणा पुरवणारेही तितकेच दोषी असतील, असे सांगितले. जिल्ह्यातील ध्वनियंत्रणांचे चालक- मालकांनी आपण लाखो रुपये खर्च करून अशा प्रकारची यंत्रणा घेतली आहे. भाडे नाही केले तर कर्जाचे हप्ते वाढतात, रोजी- रोटीचा प्रश्न निर्माण होईल. नियमांमध्ये शिथिलता द्यावी, अशी विनंती केली. आपली गाऱ्हाणी प्रत्येकाने पोलीस प्रशासनासमोर मांडली. साऊंड सिस्टीम असोसिएशनचे अध्यक्ष मुनीर मुल्ला यांच्यासह इंद्रजित ऐनापूरकर, विजय वरुटे यांनी मते मांडली.

       पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले,गणेशोत्सव काळात मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम तसेच प्रखर लेझर लावल्याने डोळ्यांवर आघात होतो, हे माहीत असतानाही काही मंडळे अशा यंत्रणांचा वापर करतात. पोलीस प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात.तसेच ध्वनी यंत्रणांचे मालक , मंडळांकडून भाडे घेत असले तरी, कायद्याला ते बांधील आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून त्यांना व्यवसाय करता येणार नाही. परवानगीपासून ते आवाज मर्यादेपर्यंत सर्व प्रकारची खबरदारी त्यांना घ्यावी लागेल.

  लेसर आरोग्याला घातक असल्यामुळे त्याचा वापर करूच नये. स्ट्रक्चरची लांबी-रुंदी, आवाज, वेळ याचे उल्लंघन झाल्यास सर्व यंत्रणा जप्त करून मंडळांसह ध्वनियंत्रणा मालक- चालक, वाहनधारक अशा सर्वांवर गुन्हे दाखल होतील याची खबरदारी घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा