Breaking

रविवार, २० ऑगस्ट, २०२३

श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन मोठ्या उत्साहात साजरा

✍🏼 सम्मेद पाटील, प्रतिनिधी



      सांगली : भारतीय ग्रंथालय शास्त्राचे प्रणेते व भारतात सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ.एस.आर.रंगनाथन यांची १३१ वी जयंती निमित्त साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय ग्रंथपाल दिन श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन, सांगली येथे वाचन कट्टा प्रा. के.एस. काळे ग्रंथालय विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच रानकवी ना. धो. महानोर यांनाही आदरांजली वाहण्यात आली.


       यावेळी कॉलेजच्या ग्रंथालयाचे मोबाईल ॲप्लिकेशन चे उद्घाटन अध्यक्ष मा. प्राचार्य मरजे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

     यावेळी बी.एड प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकडून डॉ.एस.आर.रंगनाथन यांचा जन्म, शिक्षण,सामाजिक कार्य व ग्रंथालय क्षेत्रातील त्यांचे योगदान इत्यादींबद्दल माहिती सांगण्यात आली,  तसेच निसर्गकवी ना. धो. महानोर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या निसर्ग कवितांचे वाचन व सादरीकरण करण्यात आले.


प्रथम वर्ष विद्यार्थी - सादरीकरण करताना


    आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. मरजे सर यांनी ग्रंथालय व वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. ज्ञान मिळवा, ज्ञानासोबत संपत्ती आपोआपच येईल, त्यासाठी प्रचंड वाचन करा असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाच्या इष्ट सवयी लावण्यासाठी ग्रंथालये हे एक आवश्यक साधन आहे. शिक्षकांची परिणामकारकता आणि वर्गात त्यांची अध्यापनाची कामगिरी सुधारण्यासाठी ग्रंथालये ही महत्त्वाची भूमिका बजावतात असेही ते म्हणाले.

प्राचार्य - डॉ.बी.पी. मरजे सर



ग्रंथपाल संध्या यादव

      ग्रंथपाल श्रीमती संध्या यादव यांनी ग्रंथालयाच्या मोबाइल ॲप्लिकेशन आणि OPAC बद्दल प्राध्यापक व विद्यार्थ्यांना माहिती दिली व त्याचा उपयोग कसा करायचा याचे मार्गदर्शन केले. या मोबाईल ॲप्लिकेशन निर्मितीमधील टेक्निशियन रामानंद करडे व माजी ग्रंथालय सहायक नंदकिशोर नार्वेकर यांचेही आभार मांडले.

    

द्वितीय वर्ष विद्यार्थी आकाश जाधव ग्रंथ भेट देताना

      यावेळी द्वितीय वर्ष विद्यार्थी आकाश जाधव यांनी ग्रंथालयास ग्रंथरूपी भेटवस्तू दिली. व वाचन केल्यामुळे त्यांच्या जीवनात जे सकारात्मक बदल झाले ते थोडक्यात मनोगत मांडले.


     कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.बी.पी.मरजे सर, ज्येष्ठ प्राध्यापक सुशील कुमार, प्रा. नवनाथ इंदलकर , तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बी.एड प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा