![]() |
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मार्गदर्शन करताना डॉ. महावीर अक्कोळे, प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व डॉ.एम.एस. सूर्यवंशी व इतर प्राध्यापक |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : या देशातील युवकांनी मोबाईलच्या मैदानावरून थेट क्रीडा क्षेत्राच्या मैदानावर उतरले पाहिजे असे मत प्रसिद्ध धन्वंतरी व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. महावीर अक्कोळे यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे होते.
अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला.डॉ. महावीर अक्कोळे व प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांच्या हस्ते जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकीचे खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
क्रीडा संचालक डॉ.एम.एस. सूर्यवंशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट करताना विश्वविख्यात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जीवन परिचय करून राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
डॉ. महावीर अक्कोळे मार्गदर्शन करताना म्हणाले, क्रीडा क्षेत्रात शारीरिक व मानसिक परिपक्वता निर्माण करण्यासाठी मन, मनगट व मेंदू या त्रयीचा उत्तमरीत्या वापर करून विद्यार्थ्यांनी परिपूर्ण व्यक्तिमत्व बनवावे जेणेकरून विविध क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त करता येईल. आजचा विद्यार्थी हा अभ्यास व क्रीडा केंद्रित न बनता तो मोबाईल केंद्रित बनत चालल्या असल्याबाबतचे दुःख त्यांनी व्यक्त केले. मेजर ध्यानचंद यांनी हॉकीच्या क्रीडा प्रकारात जी जादुई कामगिरी केली अशी कामगिरी भविष्यामध्ये खेळाडू कडून अपेक्षित असल्याबाबत ते बोलले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावर बोलताना प्राचार्य डॉ.सुरत मांजरे म्हणाले, जयसिंगपूर कॉलेज हे सर्व क्षेत्रात अग्रेसर असून कॉलेजचा क्रीडा विभागाची ही क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय बनत आहे. खेळाडूंनी आपापल्या क्रीडा प्रकारात उच्च कोटीची कामगिरी करून कॉलेज सह देशाचं नाव कमावावे.
या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फेन्सिंग या क्रीडा प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा.आर.डी.शिंदे, डॉ.सौ.एस.आर नकाते, ग्रंथपाल डॉ. ए.के. कुलकर्णी, प्रा.डॉ.संदिप तापकीर व जयप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल चे राहूल सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ.सौ. एस आर नकाते यांनी मानले.तर सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमास असंख्य विद्यार्थी, विद्यार्थिनी व क्रीडापटू उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा