Breaking

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

*प्रा.आप्पासाहेब भगाटे यांची कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक पदी निवड*


प्रा.आप्पासाहेब भगाटे यांची संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करताना सर्व मान्यवर


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर  : नांदणी गावचे सुपुत्र व जयसिंगपूर कॉलेजच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा.आप्पासाहेब भगाटे यांची कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक पदी निवड झाल्याने अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने प्रा. आप्पासाहेब भगाटे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ.महावीर अक्कोळे, मा.पद्माकर पाटील व जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे उपस्थित होते.


     याप्रसंगी डॉ. महावीर अक्कोळे यांनी प्रा. भगाटे यांनी कॉलेजच्या शैक्षणिक विकासातील योगदान, भूगोल विषयाचे प्राध्यापक म्हणून पूर्ण केलेली जबाबदारी, धार्मिक कार्याच्या माध्यमातून जैन धर्म व नांदणी मठासाठी सेवाभावी वृत्तीने कटिबद्ध असणारे आहेत.तसेच समाजातील विविध गरजू व गरीब घटकासाठी विविध माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत असतात. त्याचबरोबर त्यांचे उत्तम नेतृत्व , वक्तृत्व व दातृत्व अशा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रा.अप्पासाहेब भगाटे असा गौरव उद्गार त्यांनी याप्रसंगी काढला.प्रा. आप्पासाहेब भगाटे यांचा शैक्षणिक परिपूर्ण व प्रचंड अनुभवाचा लाभ अनेकांत संस्थेच्या विकासासाठी होत आहे.

      सत्काराला उत्तर देताना प्रा. आप्पासाहेब भगाटे म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील मल्टी स्टेट पतसंस्थेची झालेली पंचवार्षिक निवडणूकीत संचालक म्हणून बहुमताने निवडून आलो. माझा विजय झाला अर्थात समस्त सभासदांचा विचाराचा विजय झाल्या असल्यावर ते बोलले.माझ्या आयुष्यातील निवडणुकीची सुरुवात  सन १९७२ GS निवडणुकीच्या माध्यमातून झाली. त्यावेळी माझे मित्र डॉ.महावीर अक्कोळे सरांच्या सहकार्याने निवडून आलो. आज विजयी उमेदवार म्हणून मला जुन्या आठवणींना यानिमित्ताने उजाळा मिळाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सन १९७२ चा सत्कारानंतर तब्बल पन्नास वर्षांनी माझा झालेला आजचा सत्कार हा पुढील कार्यासाठी मला प्रेरणादायी आहे. एक संचालक म्हणून सभासदांच्या हितार्थ व योग्य विचारांच्या दृष्टीने  संस्था चालविणे हा माझा हेतू आहे. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्यासही ते बोलले.

      या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ.भावना मुचंडीकर, मानपत्राचे वाचन सौ. स्वाती शिंदे यांनी केले.तर या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.तृप्ती पाटील यांनी मानले.

     या कार्यक्रमास संस्थेचे सन्माननीय सदस्य अशोक शिरगुप्पे, शशांक इंगळे, मा.खाडे, प्रा.अभिजीत अडदंडे, डॉ.अनिल पाटील, डॉ. शीतल पाटील, मा.मादनाईक काका, माजी नगरसेवक शैलेश चौगुले,अनेकांत स्कूलच्या प्राचार्या सौ. प्रिया गारोळे व स्कूलचे शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा