Breaking

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्याकडून प्लॅस्टिकचे संकलन*

 



*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या पंचवीस एकर परिसरात प्लॅस्टिकचे संकलन केले.

      शासनाच्या परिपत्रकानुसार कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजने मधील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सोमवार दिनांक ७ ऑगस्ट, २०२३ मध्ये कॉलेज कॅम्पस मध्ये विविध ठिकाणी असलेला प्लॅस्टिक कचरा उचलण्यात आला.


    याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ. के.डी. खळदकर यांनी प्लॅस्टिक न वापरण्याची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी डॉ. प्रभाकर माने एनएसएस प्रतिनिधी भोलू शर्मा, समृद्धी एलाज, श्रेया संकपाळ, संस्कृती मगदूम, प्रथमेश कोळी, मुल्ला व एन एस एस विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा