Breaking

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

*जयसिंगपूरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने हर घर तिरंगा जनजागृती रॅली उत्साहात संपन्न*


रॅलीच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व डॉ.धनंजय कर्णिक छ.शाहू महाराज व जयसिंग महाराजांना पुष्पहार अर्पण करताना


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा महोत्सवाच्या समाप्तीजयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर व जी.के.जी.कन्या घोडावत महाविद्यालय जयसिंगपूर यांच्या संयुक्तपणे  'हर घर तिरंगा' जनजागृती करणारी रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

      केंद्र व राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार 'मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यापैकीच हर घर तिरंगा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जयसिंगपूर कॉलेजमधील व जी.के जी घोडावत कन्या कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व इतर सर्व विद्यार्थ्यांनी कॉलेज पासून शिरोळ-वाडी रोड मार्गे रॅली पुढच्या दिशेने मार्गक्रमण करीत क्रांती चौकात आली.

       प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व प्राचार्य डॉ. धनंजय कर्णिक यांनी छ. शाहू महाराज व जयसिंग महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विद्यार्थ्यांना हर घर तिरंगा रॅली बाबत संबोधिले.


       या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे जयसिंगपूर कॉलेज व जी.के जी कन्या कॉलेज चे विद्यार्थी प्रचंड संख्येने रॅलीत सहभागी होते, विद्यार्थिनीच्या हातामध्ये तिरंगा ध्वज होता व रॅलीच्या अग्रभागी होती, बहुतांशी मुलींची संख्या लक्षणीय होती, मुलींच्या हातात जनजागृती करणारे हात फलक होते, अत्यंत काटेकोर नियोजनबद्ध व शिस्तबद्ध रित्या रॅलीचे मार्गक्रमण होते. सदरच्या रॅलीत विद्यार्थ्यांच्या कडून हर घर तिरंगा जनजागृती करणारे घोषवाक्य अर्थात 'मेरी मिट्टी मेरा देश व भारत माता की जय' या घोषणेने परिसर दणाणून सोडला. या रॅलीत असणारे सर्व विद्यार्थी उत्साहात व प्रसन्न चेहऱ्याने सहभागी होते.

    या रॅलीचे उत्तम व नेटके नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. गौतम ढाले, डॉ. के.डी.खळदकर व डॉ. प्रभाकर माने , प्रा.सौ.रूपाली बस्तवाडे व प्रा.सौ.अंजना चावरे यांनी केले होते.

       या रॅलीत घोडावत कन्या कॉलेजचे प्रा.डॉ.एस.जी.पाटील, प्रा.डॉ. वाघमारे, प्रा.परशुराम माने, जयसिंगपूर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.एन.एल.कदम, डॉ.एन.पी.सावंत , प्रा. भारत आलदर , पर्यवेक्षक डॉ.महावीर बुरसे, डॉ.टी.जी.घाटगे , डॉ.एस.बी. बनसोडे, प्रा. सुनील चौगुले, प्रा.बाळगोंडा पाटील, प्रा.अमोल  पवार, प्रा.सुरज चौगुले अन्य प्राध्यापकवृंद, प्रतिनिधी भोलू शर्मा व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा