Breaking

रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

*कुरुंदवाड च्या नेहा रविंद्र शिंदे हि राज्य कर निरीक्षक परीक्षेत राज्यात सहावी*

 

कुरुंदवाड ची कन्या नेहा रवींद्र शिंदे राज्य विक्रीकर निरीक्षक परीक्षेत खुल्या गटातून राज्यात मुलींमध्ये सहावा क्रमांक


*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


 कुरुंदवाड  : येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. रविंद्र शिंदे यांची कन्या नेहा शिंदे हिचा राज्य विक्री कर निरीक्षक परीक्षेत खुल्या गटातून राज्यात मुलींमध्ये सहावा क्रमांक आला आहे. घरातील वैद्यकीय सेवेचा वारसा असून देखील नेहाने प्रशासकीय सेवेचा मार्ग निवडला. नेहाचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे कुरुंदवाड मध्येच झाले आहे. पदवीचे शिक्षण सांगली येथील  विलिंग्डन महाविद्यालयात  झाले. उच्च शिक्षणासाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे येथे काही काळ वास्तव केले. मात्र कोरोनो मध्ये झालेल्या लाॅकडाऊन मध्ये ती  कुरुंदवाड मध्ये परतली. त्यानंतर घरीच अभ्यास करीत नेहाने स्पर्धा परीक्षेचे आव्हान पूर्ण केले. यावेळी बोलताना नेहाने आई - वडीलांच्या प्रेरणेमुळे स्पर्धा परीक्षेत यश मिळाल्याचे सांगितले.

   नेहा च्या या यशाचे कुरुंदवाड परिसरातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा