Breaking

शनिवार, २६ ऑगस्ट, २०२३

सातारा जवळ झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील जयसिंगपूरचे तिघेजण ठार


साताऱ्या जवळील भीषण अपघातात जयसिंगपूरचे तिघे ठार


*प्रा.डॉ. प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


सातारा : मुंबई येथून जयसिंगपूरकडे परतणाऱ्या सव्वाखंडे कुटुंबावर आज (शनिवार) सकाळी काळाचा घाला पडला. साताऱ्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

   शशिकांत सव्वाखंडे (वय 50), मुलगा निखिल (वय 30) व सून प्रियंका निखिल सव्वाखंडे( वय 25 राहणार सर्व महालक्ष्मी मंदिरा जवळ शाहूनगर जयसिंगपूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

   जखमींना सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सव्वाखंडे यांच्या मुंबईतील एका नातेवाईकाचे नुकतेच निधन झाल्याने त्यांचे सांत्वन करण्यासाठी कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी मोटारीने मुंबईला गेले होते. शुक्रवारी रात्री जयसिंगपूरकडे परतत असताना साताऱ्या जवळ महामार्गावर आज सकाळी ही दुर्घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने जयसिंगपूर परिसरावर शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा