![]() |
खरी व खोटी नोट ओळखण्याची माहिती देत असताना डीजी कॉलेजची विद्यार्थी |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सातारा: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या स्वायत्त महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने खऱ्या व नकली चलनी नोटा ओळखण्याबाबतचे तंत्र शिकवण्याची मोहीम हाती घेतलेली असून, या मोहिमेअंतर्गत डीजी कॉलेज मधील बँकिंग चे विद्यार्थी सातारा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नागरिकांना खऱ्या व खोट्या नोटा ओळखण्याबाबतचे तंत्र शिकवत आहेत.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वर्गात घेतलेले बँकिंग विषयक ज्ञान परिसरातील जनतेलाही उपयुक्त ठरावे व आपल्याकडील ज्ञानाचा लाभ समाजातील विविध घटकांना व्हावा या भूमिकेतून महाविद्यालयातील बँक मॅनेजमेंट विभाग गेली तीन वर्षे हे अभियान राबवत आहे. प्रतिवर्षी दीड ते दोन हजार नागरिकांना खऱ्या व खोटा नोटा कशा ओळखाव्यात, खऱ्या नोटांची पारख कशी करावी याबाबतची माहिती दिली जाते. प्रत्येक विद्यार्थी किमान दहा कुटुंबात जाऊन तेथील सदस्यांना याबाबतची माहिती देत असतात प्रतिवर्षीप्रमाणेच चालू शैक्षणिक वर्षात हे विद्यार्थी घरोघर जाऊन नागरिकांना ही माहिती देत आहेत. देशातील चलनी नोटांचा दर्जा उत्तम राखण्याच्या दृष्टीने रिझर्व बँक ऑफ इंडिया विशेष प्रयत्न करत असली तरी देशात बोगस चलनी नोटांची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.
रिझर्व बँकेने दिलेल्या आकडेवारी नुसार सन २०२०-२१ मध्ये दोन लाख आठ हजार सहाशे, सन २०२१-२२ बावीस मध्ये दोन लाख तीस हजार नऊशे, तर २०२२-२३ मध्ये दोन लाख पंचवीस हजार सातशे इतक्या बोगस चलनी नोटा सापडल्या आहेत. रिझर्व बँकेच्या एका अहवालानुसार बँकिंग चॅनल मध्ये सापडलेल्या नोटांचे प्रमाण वाढत असून देशातील चलनामध्ये देखील अशा नोटांचे प्रमाण वाढत आहे सध्या डिटेक्ट झालेल्या नोटांचे प्रमाण दोन लाख 25 हजार पेक्षा अधिक असले तरी देशाच्या चलन व्यवस्थेत यापेक्षाही अधिक प्रमाणात बोगस नोटा असू शकतात अशा नोटा हजारे पणे अनेक नागरिकांच्या हातातून हस्तांतरित होत असतात अशा नोटा वेळीच ओळखून त्या चलनातून बाहेर करण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे मात्र सामान्य जनतेला खऱ्या व खोट्या नोटा कशा ओळखाव्यात याबाबतची पुरेशी जाण नसल्यामुळे अशा नोटा सर्क्युलेशन मध्ये राहत असल्याचे दिसून येते. यावरून देशातील बोगस चलनी नोटांची समस्या अधिक अधिक गंभीर होत चालल्याचे दिसून येत आहे या नोटामुळे सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे अशी फसवणूक होऊ नये म्हणून या महाविद्यालयातील बँकिंग विषय शिकणारे विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव मस्के उप प्राचार्य डॉ विठ्ठल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विजय कुंभार यांनी ही मोहीम आखली असून त्यांनी या विद्यार्थ्यांना चलनी नोटा ओळखण्याचे प्रशिक्षण दिले असून हे सर्व प्रशिक्षित विद्यार्थी गावागावात जाऊन ही माहिती पोहोचवण्याचे काम करत आहेत. या प्रकल्पामध्ये ४०० हून अधिक विद्यर्थी सहभागी झाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा