Breaking

रविवार, ३ सप्टेंबर, २०२३

*दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ :संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांची माहिती*

 

दूर शिक्षण व ऑनलाईन  शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर



*प्रा डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ ची बी.ए.,बी.कॉम,एम.ए.(मराठी,हिंदी,इंग्रजी,समाजशास्त्र,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र,इतिहास), एम.कॉम, एम एस्सी (गणित) आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस  दि. ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली.

          डॉ.मोरे म्हणाले की, दूरशिक्षण आणि ओंनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासकेंद्रांच्या प्रवेश प्रक्रियेस  विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता प्राप्त झालेली आहे.त्यामुळे जे विध्यार्थी अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांचे शिक्षण अपूर्ण आहे,शिवाय महाविद्यालयास तुकडी मान्यता न मिळाल्याने,तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच १२ वी रिपीटरच्या विद्यार्थ्यांचा पुरवणी  निकाल जाहीर केलेला आहे, अशा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दूरशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या एकूण ८७ अभ्यासकेंद्रात प्रवेशाची संधी मिळणार आहे.           त्यामुळे विद्यार्थी ,गृहिणी कामगार, सैनिक,उद्योजक,शेतकरी, सरकारी कर्मचारी,खाजगी कंपन्या आदिनी आपला प्रवेश निश्चित करावा.शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर Distance Education लिंक वर प्रवेशाबाबतची जाहिरात उपलब्ध असून http://sukapps.unishivaji.ac.in/studentregistration/#/ या ऑनलाईन लिंकवर आपला प्रवेश आजच निश्चित करावा.

   जे विद्यार्थी नियमित महाविद्यालय व मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेशित झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचा ही लाभ मिळणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमाना प्रवेशित व्हावे अधिक माहितीसाठी शिवाजी विद्यापिठातील मुख्य कार्यालयाशी अथवा नजीकच्या महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा