Breaking

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

*प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांना 'श्रेष्ठ सृजन विभूति राष्ट्रीय सन्मान आणि शंकर दयाळ सिंह प्रतिभा पुरस्काराने सन्मानित*


प्रा.डॉ. अर्जुन चव्हाण श्रेष्ठ सृजन विभूति राष्ट्रीय सन्मान 2023' ने  मणिपूरच्या राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले.


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : येथील ज्येष्ठ हिंदी समीक्षक, लेखक व शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांना नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी सम्मेलनात प्रमुख पाहुण्या मणिपूरच्या राज्यपाल अनुसुइया उइके व परिषदेचे महासचिव डॉ. बिपिनकुमार यांच्या हस्ते 'श्रेष्ठ सृजन विभूति राष्ट्रीय सन्मान 2023' ने गौरविण्यात आले. विश्व हिंदी परिषदेच्यावतीने राष्ट्रकवी दिनकर यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी सम्मेलनामध्ये हा सन्मान देण्यात आला. यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा, कवी दिनकर यांचे नातू अरविंदकुमार सिंह ही उपस्थित होते.

     हा सन्मान स्व. डॉ. भंवर सुराणा अभिनंदन समिती व विश्व हिंदी परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने राजस्थान येथील विख्यात पत्रकार व साहित्यकार स्व. डॉ. भंवर सुराणा यांच्या स्मृतीप्रित्यार्थ सुरू करण्यात आला आहे. यावेळी चव्हाण यांच्याबरोबरच वेगवेगळ्या क्षेत्रातील पाच मान्यवरांनाही गौरविण्यात आले. डॉ. चव्हाण यांनी हिंदी साहित्यामध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

  'शंकर दयाल सिंह प्रतिभा सम्माना'ने ही गौरव यावेळी डॉ. अर्जुन चव्हाण यांना विश्व हिंदी परिषदेच्यावतीने विश्व हिंदी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून विशेष योगदानाबद्दल 'शंकर दयाल सिंह प्रतिभा सम्माना'ने ही गौरविण्यात आले. हा पुरस्कार ग्लोबल ओपन यूनिवर्सिटीचे कुलाधिपति प्रो. प्रियरंजन त्रिवेदी, जम्मू-काश्मीरच्या सचिव रश्मी सिंह, प्रो. मार्केडेय राय यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

    या पूर्वी ही डॉ. चव्हाण यांना हिंदी साहित्यातील योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय व अंतर्राष्ट्रीय सन्मानांनी गौरविण्यात आले होते. त्यांचे 55 हून अधिक मौलिक, समीक्षात्मक, अनूदित तसेच संपादित ग्रंथ प्रकाशित आहेत. यापूर्वी त्यांना हिंदी साहित्य अकादमी सह अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये साहित्य शिरोमणि मॉरिशस सन्मान, मॉरिशस हिंदी अकादमी सन्मान, हिंदी साहित्य अकादमी, मुंबईचा पंडित महावीरप्रसाद द्विवेदी पुरस्कार, सुब्रह्मण्य भारती साहित्य सेतु जीवन गौरव पुरस्कार, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते अहिंदी भाषी हिंदी लेखक राष्ट्रीय पुरस्कार आदींचा समावेश आहे. तसेच त्यांना मॉरिशस, रशिया, उजबेकिस्तान यांसारख्या देशांमध्ये आंतरष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषक, प्रमुख पाहुणे, विषय तज्ज्ञ म्हणूनही निमंत्रित करण्यात आलेले आहे. डॉ. चव्हाण हे 450 हून अधिक चर्चासत्रांत, सम्मेलनांत, कार्यशाळांमध्ये अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, विषय तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन केलेले आहेत. तसेच गेले 36 वर्ष हिंदी अध्यापनाचे कार्य करीत आहेत. ते आजही निरंतर लेखन कार्यात सक्रीय आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा