![]() |
अजय हजारेचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व मान्यवर |
*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे, जयसिंगपूर कॉलेज ज्युनिअर विभागातील बारावी सायन्स चा विद्यार्थी कु.अजय दीपक हजारे यांने कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
प्रतिकूल परिस्थितीतून त्याने हे यश संपादन केले असून सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श मानला जात आहे. या त्याच्या यशात त्याचे आई-वडील,भाऊ व शारीरिक शिक्षण विभागाच्या शिक्षिका सौ अमृता पाटील यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी त्याच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले. त्याचा सत्कार केला. त्याच्या पुढील वाटचालीस सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य श्री.बी.ए.आलदर पर्यवेक्षक डॉ.एम.जे. बुरसे, डॉ.महाजन मॅडम व अजय हजारे चे आई-वडील उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा