Breaking

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३

*लोकसंख्या नियंत्रण व दारिद्र्य निर्मूलनासाठी शासनाकडे दीर्घकालीन व सक्षम धोरणाची आवश्यकता : उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत*


भितीपत्रक उद्घाटन व मार्गदर्शन करताना डॉ.एन.पी. सावंत, प्रा.डॉ. सुनील बनसोडे व अन्य मान्यवर


*कु.स्वाती शिंदे  : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर :  जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून जयसिंगपूर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 'लोकसंख्या व दारिद्र्य' या विषयाच्या अनुषंगाने भितीपत्रकाचे उद्घाटन  व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले यावेळी उपप्राचार्य प्रा.डॉ. एन.पी.सावंत यांच्या हस्ते भितीपत्रकाचे उद्घाटन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ विद्या परिषदेचे सदस्य प्रा.डॉ.एस.बी. बनसोडे उपस्थित होते.


      भितीपत्रक उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. सावंत  म्हणाले, या देशातील वाढती लोकसंख्या व प्रचंड दारिद्र्य हे दोन  सामाजिक राष्ट्रीय विषय असून ते गंभीर बनत चालले आहेत. यासाठी शासनाकडे दीर्घकालीन व सक्षम राष्ट्रीय धोरणाची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांनी वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न जनसमुदायांमध्ये विविध पद्धतीने मांडून जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच दारिद्र्याबाबत बोलताना ते म्हणाले, आर्थिक दारिद्र्य अत्यंत वाईट असून यापेक्षा वैचारिक दारिद्र्य महाभयानक आहे. यासाठी देशातील प्रत्येक घटकाने शिक्षणाच्या माध्यमातून साक्षरता वाढवून हा देश १०० टक्के साक्षर करणे काळाची गरज बनलेला आहे.

      अध्यक्ष स्थानावर बोलताना डॉ. बनसोडे म्हणाले, अर्थशास्त्र विभाग सातत्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून सक्रिय असते. आज व्याख्यान व भितीपत्रकाच्या आयोजनाच्या माध्यमातून रचनात्मक कार्य करताना दिसत आहेत. या देशाचे वाढती लोकसंख्या व दारिद्र्य हे दोन मोठे शत्रू असून त्याच्यावर वेळीच नियंत्रणाची आवश्यकता आहे.


     याप्रसंगी विद्यार्थ्यांनी पोस्टरचे उत्तम पद्धतीने सादरीकरण केले.

    या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. कु. माधुरी कोळी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. वंदना देवकर  यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. विश्रांती माने यांनी मानले.  या कार्यक्रम आयोजनासाठी प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

   या कार्यक्रमास अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.पी.टी.माने, डॉ.एस.जी. संसुद्धी, डॉ. के.डी.खळदकर, प्रा.डॉ.राजू कोळी, प्रा. कविता चानकने, प्रा. सुरज चौगुले, प्रा.कांबळे , श्री.भोलू शर्मा व  एम.ए. व बी. ए. अर्थशास्त्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      अर्थशास्त्र विभागाच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा