![]() |
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उप-कुलसचिव श्रीमती प्रिया देशमुख व संचालक, डॉ.तानाजी चौगुले, डॉ.संजय पाटील व डॉ.आदिनाथ कांबळे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली अर्थात (PFMS) सर्व लाभार्थ्यांना अत्यंत उपयुक्त व भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याबाबतचे मत उपकुलसचिव सौ.प्रिया देशमुख यांनी प्रतिपादन केले. त्या शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने आयोजित सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली 'कोल्हापूर जिल्हा मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळेत" त्या बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.डॉ. तानाजी चौगले उपस्थित होते.
श्रीमती प्रिया देशमुख म्हणाल्या, PFMS प्रणालीच्या माध्यमातून सर्व आर्थिक व्यवहार उत्तम व सुगम पद्धतीने हाताळता येतात. यामध्ये पारदर्शकता असल्याने व्यवहाराबाबत शंका निर्माण होत नाही. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने PFMS च्या माध्यमातून कॉलेज पातळीवरील राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व आर्थिक व्यवहार आता सहजरीत्या व सुलभपणे करता येणार आहे. या संदर्भात त्यांनी सखोल माहिती दिली.
त्याचबरोबर धीरज पोतदार, कार्तिक सर आणि सतीश हुक्कीरे यांनी तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. त्याचबरोबर Hands-on ट्रेनिंग च्या माध्यमातून प्रत्यक्षात कार्यक्रम अधिकारी व लिपिकांना संगणकावर प्रशिक्षण दिले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण करून त्यांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे कार्यशील संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमा संदर्भात माहिती दिली तसेच 'ऑनलाइन विद स्मार्ट वर्क' च्या माध्यमातून कामकाज कशा पद्धतीने हाताळता येते याबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर २०२३-२४ शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारचे विद्यापीठ, राज्यस्तरीय व राष्ट्रीय कॅम्प बाबत इथंभुत माहिती देऊन शैक्षणिक वर्षात रचनात्मक कामाच्या माध्यमातून सर्व घटक कसे सक्रिय राहतील याबाबत प्रोत्साहित केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी केले. प्रथम सत्राचे आभार प्रदर्शन कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील व दुसऱ्या सत्राचे आभार कोल्हापूर जिल्हा सह समन्वयक डॉ. आदिनाथ कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने करण्यात आले. यासाठी श्री. मुंडे व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यशाळेबाबत उपस्थित असणारे कार्यक्रम अधिकारी व अन्य घटकांनी समाधान व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा