![]() |
27वी वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेचे चेअरमन प्रा. के बी पाटील, संस्थापक संचालक डॉ. सुभाष अडदंडे व सत्कारमूर्ती प्रा. आप्पासाहेब भगाटे मार्गदर्शन करताना |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : अनेकान्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर ता. शिरोळ, जि. कोल्हापूरची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीत संपन्न झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. कुमार भिमगोंडा पाटील, व्हाईस चेअरमन प्रा.पी.सी.पाटील, संस्थापक संचालक डॉ.सुभाष अडदंडे व कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.
पतसंस्थेचे चेअरमन श्री. कुमार भिमगोंडा पाटील यांनी उपस्थित मान्यवर व सभासदांचे स्वागत करून २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती दिली. सभासदांना १३ टक्के लाभांश देणेबाबत आश्वासित केले.
यावेळी अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे संचालक प्रा. आप्पासाहेब भगाटे यांची कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी या पतसंस्थेच्या नूतन संचालक पदी निवड झाल्याने पतसंस्थेचे वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा.भगाटे यांनी पतसंस्थेच्या पदाधिकारी, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करून पतसंस्थेच्या आर्थिक वाटचाल व समाजभिमुक कामाबाबत गौरवउद्गार काढले. यावेळी ऑडिटर एस.आर.पाटील,व्यवस्थापक राहुल पाटील, सुधाकर पाटील, कुबेर गायकवाड व सौ.मंदाकिनी बंटोगळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थापक संचालक डॉ. सुभाष अडदंडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा धावता आढावा घेऊन सभासदांच्या सहकार्याने पतसंस्था सलग १२ वर्षे 'अ' वर्ग ऑडिट प्राप्त केले असल्याबाबत ते बोलले. यासाठी सर्वस्वी या पतसंस्थेचे सर्व घटक कारणीभूत आहेत.
संस्था उपविधीप्रमाणे संस्था चेअरमन प्रा.के.बी.पाटील यांची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रा. पी.सी.पाटील यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा व सामाजिक कार्याचा आढावा मांडून संस्था सभासदांचे कल्याण व हितार्थ संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.
पतसंस्थेचे संचालक कालवश प्रा.मिश्रीकोट कर व प्रा. गणपुले यांना आदरांजली वाहण्यात आली.पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री.राहुल पाटील यांनी सभेपुढील सर्व विषयाचे वाचन करून कामकाजाबाबत माहिती दिली. सभेसमोरील सर्व विषयास उपस्थित सभासदांनी एक मताने मंजुरी दिली. यावेळी सभासदांना १३ टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले.
या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आभार प्रदर्शन संचालिका डॉ.सौ विजयमाला चौगुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमास स्थानिक व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी पद्माकर पाटील, अशोक शिरगुप्पे सर, मा.इंगळे, सदर कार्यक्रमास विद्यमान संचालक मंडळातील श्री. अभिजीत सुभाष अडदंडे, श्री. महावीर शामगोंडा पाटील, डॉ.सौ. विजयमाला विरेंद्र चौगुले, संचालक श्री. हिरालाल गोकुळ पवार, श्री. सुनिल बापू कणसे, श्री. सुहास आण्णाप्पा हिरुकडे , श्री.प्रदीप बाबु सुतार , मॅनेजर श्री. राहुल कलगोंडा पाटील व सेवक वर्ग श्री. सुधाकर जवाहर पाटील हे उपस्थित होते. त्याचबरोबर माजी नगरसेवक शैलेश चौगुले उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा