![]() |
प्रा. आप्पासाहेब भगाटे यांची संचालक पदी निवड झाल्याने सत्कार करताना डॉ.एम. व्ही काळे व प्रा. के बी पाटील. सोबत पद्माकर पाटील व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेजच्या सीनियर व ज्युनियर कॉलेज मधील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक व कर्मचारी यांच्या वतीने प्रा. आप्पासाहेब भगाटे यांची नूतन संचालक पदी निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, खजिनदार पद्माकर पाटील, सत्कारमूर्ती प्रा.आप्पासाहेब भगाटे व प्राचार्य डॉ. सुरत मांजरे उपस्थित होते.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.प्रा. भगाटे यांच्या विषयी बोलतात ते म्हणाले, सरांचे व्यक्तिमत्व बहुश्रुत असून एकाच वेळी मल्टी टास्क करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. भविष्यात त्यांच्या परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या गुणवैशिष्ट्यांचा अर्थात कौशल्याचा लाभ निश्चितपणे सर्व घटकांना मिळणार आहे.
कॉलेजचे उप-प्राचार्य प्रा.डॉ.सौ.एम. व्ही.काळे यांच्या हस्ते प्रा. आप्पासाहेब भगाटे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना प्रा. आप्पासाहेब भगाटे म्हणाले, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर ने सन १९७२ पासून ते आजतागायत माझ्या वैयक्तिक विकासासाठी बराच अनुभव व महत्त्वाच्या गोष्टी भरभरून दिल्या. खरं म्हणजे हा सत्कार म्हणजे माझ्या दृष्टीने मी माझे महत भाग्य समजतो. माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व घटकांचा हा सन्मान आहे. मी ज्या पद्धतीने शैक्षणिक धार्मिक व सामाजिक क्षेत्रात ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने इथून पुढे कर्मवीर मल्टीस्टेट पतसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. सभासद हा केंद्रबिंदू मानून त्याच्या हितार्थ काम करणार असल्याचेही ती बोलले.
कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.सौ. विजयमाला चौगुले यांनी मानले. तर सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर माने यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी व मान्यवर संचालक, सीनियर व ज्युनियर कॉलेजमधील सर्व उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक, प्रशासकीय सेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा