Breaking

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

*ब्रह्मा मल्टीपर्पज को-ऑप. निधी लि. या संस्थे तर्फे भव्य गौरी सजावट स्पर्धेचा उत्साहात व यशस्वी आयोजन*

 

बेडगच्या ब्रह्मा मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह निधी लिमिटेड संस्थेने आयोजित केली गौरी सजावट स्पर्धा


*भोलू शर्मा  : विशेष प्रतिनिधी*


मिरज : तालुक्यातील बेडग गावमधील दोन वर्षीय आर्थिक यशस्वी वाटचाल सुरू असणारी संस्था म्हणजे ब्रह्मा मल्टीपर्पज को-ऑप. निधी लि. या संस्थेतर्फे आयोजित भव्य गौरी सजावट स्पर्धा चे नियोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेमध्ये विजेत्यांना विशेष आकर्षक गिफ्ट ठेवण्यात आलेले होते. ही स्पर्धा दिनांक २१सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत राबवण्यात आली.

   या स्पर्धेचे स्वरूप गौरी गणपतीच्या सजावटीचे फोटो पाठवून स्पर्धेत सहभागी होण्याचे होते. दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी या स्पर्धकांचे निकाल जाहीर करण्यात आले.यामध्ये प्रथम क्रमांक सौ. शिला बाळासाहेब पवार व द्वितीय क्रमांक सौ.शुभदा हरीकृष्ण गुरव तसेच तृतीय क्रमांक सौ.स्वाती सचिन माने यांनी विजय मिळवला आहे.या तिन्ही स्पर्धकांनी पारंपारिक पद्धतीने गौरी सजावट करून एक अनोख्या पद्धतीने सजावटीची मांडणी केली होती. या स्पर्धेत गौरीगणपती ची सजावट, चंद्रयानाची यशस्वी मोहीम, महादेवांच्या शिवलिंगाची मनोभावे पूजा करीत असलेल्या गौरी दाखवण्यात आल्या आणि पूर्वीच्या काळात घरातील स्त्रिया जात्यावर गव्हाचे तसेच ज्वारीचे पीठ करत असे आजच्या कळात ते दुर्मिळ होत चालले आहे त्यामुळे ती परंपरा आठवून देऊन विजेत्यांनी एक वेगळंच प्रदर्शन केल आहे.तसेच त्या पद्धतीची मातीच्या मटक्यात लोणी काढणारी गौरी चे सजावट देखील तितकेच विलक्षनीय होती. अशा विविध विषयांना स्पर्श करणारी उत्तम प्रकारची सजावट करून जुन्या परपरांना उजाळा देण्याचे काम  स्पर्धकांनी करून विजयी मिळवला आहे. 

   ब्रह्मनिधी बँक ही सातत्याने प्रत्येक वर्षी काही ना काही विशेष स्पर्धेचे आयोजन करत असते त्यामध्ये ब्रम्हा उद्योग समूहाचे संस्थापक मा. श्री. मारुती माळी सरांचे मोलाचे मार्गदर्शन सातत्याने मिळत असते.

     गौरी गणपतीच्या काळात महिलांच्या सुप्त कलागुणांना संधी देण्यासाठी ब्रह्मा मल्टीपर्पज को-ऑप. निधी लि. ब्रम्हा मल्टीपर्पज संस्थेने स्पर्धेत आयोजन करून स्पर्धकांच्या मध्ये उत्साह निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व स्पर्धकांनी या संस्थेविषयी मनस्वी आभार व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा