![]() |
शिवाजी विद्यापीठ दूर शिक्षण केंद्र कोल्हापूर |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या बी.ए.,बी.कॉम.,एम ए., (मराठी,हिंदी,इंग्रजी,अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास),एम.कॉम.,एम.एस्सी (गणित),एम.बी.ए. या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची द्वितीय व तृतीय वर्गासाठी शैक्षणिक वर्ष 2023 - 24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे भाग 1, 2 व 3 आणि रिपीटर विषयांचे ऑनलाईन अर्ज भरणेसाठी विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ संकेतस्थळावर https://www.unishivaji.ac.in वरून web App या टॅबला क्लिक करून https://www. unishivaji. ac . in /online_portal/ वर क्लिक केल्यानंतर Distance Student Examination Form अर्जा मधील विषयांची माहिती तपासून सादर करणेची आहे. यासाठी विद्यार्थ्यानी आपला PRN User ID वापरून त्या लॉगिनमधून परीक्षा अर्ज भरणेचा आहे. रिपीटर व फ्रेश अर्ज करण्याची मुदत दि. 04 ऑक्टोबर पर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या अभ्यासकेंद्राशी व मुख्यालयातील 02312609451,52 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक प्रा. डॉ. डी. के. मोरे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा