![]() |
अमृत कलश सुपूर्त करताना |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : 'मेरी माटी - मेरा देश' या उपक्रमांतर्गत शिरोळ तालुक्यातील महाविद्यालयानी विविध भागातून संकलित केलेली मातीरुपी अमृत कलश हे या उपक्रमाचे तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर कडे हस्तांतरित केले.
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. तानाजी चौगले यांच्या आदेशानुसार, शिरोळ तालुक्यातील ४ महाविद्यालयानी अर्थात जी.के.जी. घोडावत कन्या महाविद्यालयाने अमृत कलश हस्तांतर करण्याचा सुंदर कार्यक्रम घेऊन प्राचार्य प्रा.डॉ. धनंजय कर्णिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. गौतम ढाले व डॉ. वाघमारे यांनी सदर अमृत कलश डॉ. प्रभाकर माने व डॉ.के. डी. खळदकर यांच्याकडे सन्मानाने सुपूर्द केला. यावेळी डॉ. प्रभाकर माने यांनी मेरी माटी मेरा देश या उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
कुरुंदवाडचे सहकार भूषण एस.के.पाटील महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी तसेच डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर चे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रकाश चौगुले व प्रा.मोरे यांनी अमृत कलश जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांचेकडे मनोभावे हस्तांतरित केला.
सदर संकलित केलेले अमृत कलश हे शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा