Breaking

रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

*नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने युवकाची शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत होवून भारत जगाची ज्ञान महासत्ता बनेल : मानव्य अधिष्ठाता प्रा.डॉ.महादेव देशमुख यांचे प्रतिपादन*


बी. ए.भाग 2 च्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा.डॉ. महादेव देशमुख, अधिष्ठाता, मानव्यशास्त्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व अध्यक्षीय भाषण करताना प्रा.डॉ. त्रिशाला कदम व अन्य मान्यवर 


*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


इचलकरंजी : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे युवकांची शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत होवून भारत जगाची ज्ञान महासत्ता बनू शकेल असे मत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मानव्य अधिष्ठाता प्रा.डॉ.महादेव देशमुख यांनी प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रा.डॉ.सौ.अर्चना जगतकर, चेअरमन, समाजशास्त्र, प्रा.डॉ. जयवंत इंगळे चेअरमन, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ व प्राचार्य प्रा. (डॉ.) त्रिशला कदम या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.

   श्रीमती. आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविदयालय, इचलकरंजी येथे शनिवार,दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी बी. ए. भाग -२ NEP-२०२० नुसार सुधारित अभ्यासक्रमावर आधारित सहकार, श्रम कल्याण, समाजशास्त्र व एचएसआरएम या विषयाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

  सुरुवातीस  प्रमुख पाहुणे व बीजभाषक प्रा (डॉ) एम.एस. देशमुख यांनी रोपट्यास जल अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन केले.

    प्रा.डॉ. देशमुख कार्यशाळेत मार्गदर्शन करताना म्हणाले, शिक्षण,आरोग्य, जीवनमान/रोजगार याचा विकास नवीन शैक्षणिक धोरणामुळे शक्य होणार आहे.त्यामुळे याचा प्रचार आणि प्रसार कॉलेज पातळीवर होणे गरजेचे आहे.प्राध्यापकाची गुणवत्ता व विश्वासहर्ता वाढवायची असेल त्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तम दर्जाचा क्रेडिट कोर्स सुरू करावा.यासाठी जुना शैक्षणिक मोड बदलणे गरजेचे आहे.

      प्रत्येक प्राध्यापकाला आपला विषय जिवंत ठेवायचा असेल व व्यावसायिक दृष्टीने पुढे शिक्षण व्यवस्था उचित पद्धतीने मार्गक्रमित करावयाची असेल तर नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचे आहे.

    आजच्या परिस्थितीत गोलबल innovation इंडेक्स आणि मानव विकास निर्देशांकत सकारात्मक बदल घडवून आणावयाचा असेल त्यासाठी हे नवीन शिक्षण धोरण मैलाचा दगड ठरू पाहत आहे.

     अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रा.डॉ.सौ. त्रिशाला कदम म्हणाल्या, नवीन शिक्षण धोरण हे विद्यार्थी केंद्रित असून या धोरणाचा स्वीकार करून विद्यार्थी हितार्थ नवीन अभ्यासक्रमाची आखणी उत्तमपणे केली आहे तसेच या शिक्षण धोरणामुळे कौशल्य आधारित कोर्सची संख्या वाढली असल्याचेही त्या म्हणाल्या.

  

      कार्यशाळा समन्वयक डॉ. धीरज शिंदे, इतिहास विभाग यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यशाळा आयोजन करण्याचा हेतू स्पष्ट केला.तर पाहुण्यांचा परिचय डॉ. संपदा टिपकुर्ले अर्थशास्त्र विभाग यांनी केला.

    या कार्यक्रमाचे आभार प्रा. किरण कानडे यांनी मानले.सदर कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. वर्षा पोतदार व प्रा. संदीप पाटील यांनी केले.

       कार्यशाळा समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य प्रा.डॉ.देसाई उपस्थित होते. त्याने नवीन शिक्षण धोरणाबाबत व संपन्न झालेल्या कार्यशाळेबाबत आपलं मत प्रदर्शित करून कॉलेज आयोजकांचे अभिनंदन केले.

     या कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या उत्तम नियोजन व आयोजनबाबत उपस्थित प्राध्यापक घटकाकडून समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा