![]() |
जयसिंगपूरच्या शाहू नगरात सोनसाखळी चोरीचा गुन्हा नोंद |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील शाहूनगर मध्ये चैन स्नाचिंगची (सोनसाखळी चोरीची) घटना घडली असून याबाबत अज्ञात चोरट्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
अधिकृत सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जयसिंगपूरच्या शाहू नगरात रस्त्याने जात असताना श्रीमती शोभा जिनेश्वर चकोते यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दोघा अज्ञात चोरट्याने मोपेड वरून येऊन हिसडा मारून पळवण्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये जवळपास ९६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
अधिक सखोल तपास जयसिंगपूर पोलिसांकडून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा