![]() |
अबॅकस परीक्षेत सुयश लाभलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे, सीईओ,प्रा. अभिजीत अडदंडे, मुख्याध्यापक सौ.प्रिया गारोळे मॅडम व सौ भावना मुचंडीकर मॅडम व अन्य मान्यवर |
*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : निपुण अबॅकस सांगली यांच्यामार्फत स्टेट लेव्हल अबॅकस अॅण्ड अरिथमॅटिक कॉम्पिटीशन (राज्यस्तरीय अबॅकस व मानसिक अंकगणित स्पर्धा ) चे सांगली येथील आचार्य आदिसागर हॉल मध्ये दि. 15/10/2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेकान्त इंग्लिश मिडीअम स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज, जयसिंगपूर मधील 23 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जिल्ह्यतील 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना आठ मिनिटांमध्ये दीडशे गणिते सोडविण्याचे आव्हान दिले होते. यामध्ये कु. आर्यन अमोल अवताडे (2 री) याने चॅम्पियन शिपची ट्रॉफी व सायकल पटकावली. तसेच कु. ब्राह्मी भारत खवाटे (2री) दुसरा क्रमांक तर कु. परल प्रशांत टोणे (2री) तिसरा क्रमांक, शाल्वी सचिन पाटील(4थी) चौथा क्रमांक पटकाविला.
अनेकांत स्कूलच्या यशाची परंपरा अखंडित ठेवली तसेच 23 विद्यार्थ्यांपैकी 17 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. यामध्ये देवराज योगेश बलदवा, रुही संदिप होंजे, राशी संदिप होंजे, विक्रांत विठ्ठल पाटील, राघव सुमित गवळी, अस्मी सुमित पाटील,अर्णव जीवन किल्लेदार, रणवीर नितीन केकले, स्वरा संजय मंडलिक, जयस्वा जयदीप पाटील, श्लोक गजानन मगदूम, रुद्र गुरुदेव माने, गौरी चंदर बन्ने यामध्ये त्या विद्यार्थ्यांचे कष्ट तसेच अनेकांत एज्युकेशन सोसायटी, लोकल कमिटीचे सर्व मा. पदाधिकारी, निपुण अबॅकस क्लासचे शिक्षकवृंद प्रदीप पाचोरे सर व पूर्वा पाचोरे मॅडम तसेच स्कूलचे सीईओ प्रा.अभिजीत अडदंडे , मुख्याध्यापिका सौ.प्रिया गारोळे मॅडम व सौ भावना मुचंडीकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजाच्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा