*प्रा.डॉ. महावीर बुरसे : उपसंपादक*
जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर मध्ये एम.ए. भाग-१ सत्र १ व २ अर्थशास्त्र विषयाची NEP २०२० नुसार नवीन सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळा मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबर, २०२३ रोजी संपन्न झाली.
या कार्यशाळेचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून मानव्यशास्त्र अधिष्ठाता व सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्रा.डॉ. महादेव देशमुख होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुभाष अडदंडे होते. तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे, अध्यक्ष प्रा.डॉ. जयवंत इंगळे व कॉलेजचे उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ.एम. व्ही.काळे उपस्थित होत्या.
प्रा.डॉ. महादेव देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले,नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे शैक्षणिक क्षेत्रात सर्वकष क्रांती घडवून आणणार असल्याचं प्रतिपादन प्रा.डॉ. महादेव देशमुख यांनी केले.ते पुढे म्हणाले,नवीन शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक कौशल्याचा विकास होऊन तो नोकरी मागणारा नाही, तर इतरांना नोकरी देणारा होईल.तसेच भविष्याचा वेध घेण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्याचा विकास होईल.
शिक्षणातील क्रांतीच्या या आराखडायाची अंमलबजावणी जर ठरल्याप्रमाणे झाली तर निश्चितच या धोरणातून सर्वांगीण विकास घडेल, असे चित्र आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यक्षम अंमलबजावणीची सर्वस्वी जबाबदारी ही शैक्षणिक संस्था व प्राध्यापक घटकांची आहे.
प्रथम व द्वितीय सत्रामध्ये छ. शिवाजी कॉलेज सातारचे विख्यात अर्थतज्ज्ञ प्रा.डॉ. अनिलकुमार वावरे यांनी प्रथम व द्वितीय सत्रा मध्ये रिसोर्स पर्सन म्हणून research methodology, Indian capital market ecological and research economics, Nobel laureate या विषयावर उत्तम मांडणी केली, यावेळी सत्राध्यक्ष प्रा.डॉ. किरण पवार व प्रा.डॉ.संजय धोंडे लाभले होते.
तृतीय सत्रामध्ये देवचंद कॉलेज, अर्जुन नगरचे प्रा.डॉ. संतोष यादव यांनी micro economic analysis, monetory economics and on job training या विषयावर सविस्तर मांडणी केली. सत्राध्यक्ष म्हणून प्रा. जालिंदर यादव उपस्थित होते. तर चौथ्या सत्रामध्ये विलिंग्डन महाविद्यालय, सांगलीचे डॉ. मनोहर कोरे साधन व्यक्ती (Resource Person) म्हणून agriculture economics , agriculture development in India and public economics याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी सत्राध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.विजय देसाई उपस्थित होते.
समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे, अध्यक्ष प्रा.डॉ. जयवंत इंगळे होते.तर अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ.सौ.एम. व्ही.काळे उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ. जयवंत इंगळे यांनी अर्थशास्त्र विषयाच्या अनुषंगाने सांगोपांग पद्धतीने भाष्य केले. उपस्थित सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या सत्राचे आभार कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रभाकर माने यांनी मानले. या संपूर्ण कार्यशाळेचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. स्वाती बस्तवाडे यांनी केले.
सदरची कार्यशाळा ही सकाळी ११.०० ते ५.३० यावेळेत कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सुंदर पद्धतीने स्वागत कमान करून सुशोभीकरण केले होते. स्वागत कमानीपासून ते मुख्य हॉल पर्यंत रेट कार्पेट होते. तसेच भारतीय व विदेशी अर्थशास्त्रज्ञांचे फोटो लावण्यात आले होते. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यशाळेचे उत्तम व नेटकेपणाने नियोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुरत मांजरे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली कार्यशाळा समन्वयक डॉ. प्रभाकर माने व सह समन्वय डॉ. व्ही.बी.देवकर , प्रा.सौ. स्वाती बस्तवाडे, प्रा. मेहबूब मुजावर,प्रा. माधुरी कोळी, प्रा.यास्मिन मुल्ला, प्रा.सौ.विश्रांती माने व भोलू शर्मा यांनी उत्तम पद्धतीने पार पाडले.
या कार्यशाळेसाठी स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष अडदंडे, सचिव डॉ.महावीर अक्कोळे , खजिनदार पद्माकर पाटील, संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.सौ.एम. व्ही.काळे ,उपप्राचार्य प्रा.डॉ.नितीश सावंत,उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.एल.कदम, कार्यालयीन अधीक्षक श्री. ए.बी.कांबळे , श्री. संजय चावरे व प्रा.बी. ए.पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा