![]() |
चिपरी हद्दीतील एका लॉजवर केली कारवाई |
जयसिंगपूर : चिपरी हद्दीतील चौंडेश्वरी फाट्या जवळ असणाऱ्या एका लॉजवर कारवाई करून शिरोळ मधील एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
अधिकृत सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर शहरा लगत असणाऱ्या तसेच चौंडेश्वरी फाटा जवळील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली. तदनुसार जयसिंगपूर पोलिसांनी लॉजवर छापा टाकून शिरोळचे श्री. लखन श्रीकांत कांबळे या संशयीत आरोपीस अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार सदर आरोपीने वेश्या व्यवसायासाठी लॉज भाड्याने घेतला होता.त्याने महिलांच्या गरीबीचा फायदा घेत व पैशाचे प्रलोभन दाखवीत वेश्या व्यवसायास करण्यास प्रवृत्त करीत होता. याचा जयसिंगपूर पोलिसांना सुगावा लागताच पोलिसांनी सदर लॉजवर धाड टाकली. सदर आरोपीस रंगेहात पकडले.
या आरोपीवर कलम ३७० प्रमाणे अनैतिक व्यापार प्रतिबंधित अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास जयसिंगपूर पोलिसांकडून केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा