![]() |
राजकीय पुढारी व लोक प्रतिनिधींना गाव बंदीचा आदेश |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
सांगली : संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तीव्र व जोरकस मोर्च व आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठा बांधवांमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. सरकार सातत्याने मराठा आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा समाज बांधवांची दिशाभूल करीत आहे.अशावेळी मराठा आरक्षणासाठी जीव धोक्यात घालून आमरण उपोषण कधी आंदोलन या माध्यमातून आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न करणारे मराठा बांधव मनोज जरांगे पाटील हे लढत आहेत. अशावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा बांधव विविध माध्यमातून प्रतिसाद देत आहेत. अशावेळी राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधींना गावबंदीचा आदेश काढून गाव बंदी करण्यात आली आहे.
याच अनुषंगाने कवठेमंकाळ तालुक्यातील मौजे कुची ग्रामपंचायतीने मराठा आरक्षण मिळवणे व पाठिंबा देण्यासाठी ग्रामपंचायातीने लोकप्रतिनिधी व राजकीय पुढाऱ्यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गाव बंदीचा ठराव करण्यात आला आहे.
मौजे कुची हे गाव सांगली जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक दृष्ट्या प्रगत गाव आहे. या गावातील ग्रामपंचायत सभेमध्ये सदर ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील मराठा आरक्षणाच्या दिशेने येथील राजकीय प्रवास बदलणार असल्याने या गावातील सर्वानुमते घेतलेला निर्णय सर्व राजकीय पुढाऱ्यांना मान्य करावा लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा