Breaking

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ; विद्यार्थ्यांनी जागवल्या जुन्या आठवणी*


माजी विद्यार्थी स्नेहमेळावाचे उद्घाटन करताना माजी उपप्राचार्य प्रा. ए.टी चौगुले, प्रा.के.बी.पाटील,प्रा.डॉ. ए. ए.पुजारी, प्रमुख पाहुणे उपप्राचार्य डॉ.एन.पी.सावंत व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. टी.जी.घाटगे व सौ.स्वाती सासणे, झाकीर नदाफ


*प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये सन २०१०-२०११ मधील कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. टी.जी.घाटगे व प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत होते.

      कला शाखेच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवार दिनांक १९ नोव्हेंबर, २०२३ रोजी कला शाखेचे सर्व शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. सुरुवातीस  माजी विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पस परिसरा मधील प्लॅस्टिक संकलन करून तर काही ठिकाणी परिसर स्वच्छ करीत स्वच्छता अभियान राबवून रचनात्मक कामाच्या माध्यमातून स्नेह मेळावाला प्रारंभ केला.तसेच स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची जयंती साजरी केली.

      सुरुवातीस माजी उपप्राचार्य प्रा. ए.टी. चौगुले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.तसेच माजी उपप्राचार्य  प्रा.के.बी.पाटील यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन केले.माजी उपप्राचार्य व जयसिंगपूर कॉलेज माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष  प्रा.डॉ.ए.ए.पुजारी, उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.पी.सावंत, प्रा.डॉ.टी.जी. घाटगेव डॉ.प्रभाकर माने यांनी दीप प्रज्वलित केले.

     माजी विद्यार्थीनी सौ. स्वाती सासणे यांनी या कार्यक्रमातील सर्व मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.

      यावेळी उपस्थित सर्व प्राध्यापकांचा व माजी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्राध्यापक व माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत अनुभव कथन केले. माजी विद्यार्थ्यांचे आयुष्य व भविष्य आनंदमय, सुखमय व समाधानकारक होण्यासाठी प्राध्यापकांनी आपापल्या शैलीत यशस्वीतेसाठीचा कानमंत्र दिला. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व घटकांचे डोळे आनंद अश्रुने  डबडबले होते. संपूर्ण हॉलमधील प्राध्यापक व माजी विद्यार्थी भावनामय झाले होते.

      यानंतर माजी विद्यार्थ्यांनी कला व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंदाची मेजवानी व सर्वांचे मनसोक्त मनोरंजन केले. सर्व प्राध्यापक व माजी विद्यार्थ्यांच्या नाश्ता व जेवण्याची उत्तम सोय केली होती. या कार्यक्रम समाप्तीनंतर प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातील आठवणीची शिदोरी घेऊन घरी गेले.

     या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन सौ. स्वाती सासणे, झाकीर नदाफ व सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चातून केले.

      या कार्यक्रमासाठी जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी उत्तम सहकार्य केले. माजी विद्यार्थी संघटनेने ही बहुमोल सहकार्य केले.

       जयसिंगपूर कॉलेज माजी विद्यार्थी संघटना च्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आपणही माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आयोजित करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा