![]() |
डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला स्वायत्तेचा दर्जा मिळाल्यानंतर श्री.विजयराज मगदूम व डॉ.सोनाली मगदूम यांचा सत्कार करताना. कॅम्पस डायरेक्टर डॉ. आडमुठे व प्राचार्य.डॉ.सौ. पाटील |
*भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर: यूजीसी , नवी दिल्ली यांनी डॉ. जे. जे. मगदुम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जयसिंगपूर या महाविद्यालयाला स्वायत्त संस्थेचा दर्जा अर्थात Autonomus status नुकताच बहाल.केला आहे. यूजीसी ने महाविद्यालयाच्या सर्व सोई- सुविधा, इंफ्रास्ट्रक्चर, अद्यावत प्रयोगशाळा, अनुभवी व क्वालिफाइड प्राध्यापक , संशोधन असे निकष व अन्य बाबींचा विचार करुन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून स्वायत दर्जा लागू केला आहे.तसेच प्रथम वर्ष व पदवुत्तर पदवी चे प्रवेश राज्याच्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेनुसारच होणार आहेत. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असून, त्यांचे ही या कामी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजयराज मगदूम व व्हाईस चेअरपर्सन सौ. सोनाली मगदूम यांनी दिली.
जयसिंगपूर शहर म्हणजे तत्कालीन काळातील तंबाखूच्या व्यापाराची बाजारपेठ म्हणून नावरुपास आले होते. त्यावेळेस डॉ. जे.जे. मगदूम यांनी आपल्या सुविद्य पत्नी डॉ. प्रभा मगदूम ह्यांच्या सहकार्याने डॉ. जे.जे.मगदूम ट्रस्टची १९७२ साली स्थापना केली. विविध शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या जोडीने स्वतःच्या कार्य कर्तुत्वावर या संस्थेला अल्पावधीतच नावलौकिक मिळवून दिले. जयसिंगपूर नगरीची ओळख शैक्षणिक पंढरी म्हणून संपूर्ण देशात करून दिली.त्यांच्याच विचारांचा वसा आणि वारसा त्यांचे पुत्र डॉ.विजयराज मगदूम व व्हाईस चेअरपर्सन डॉ. सौ. सोनाली मगदूम पुढे चालवत आहेत. डॉ.जे.जे.मगदूम यांच्या निधनानंतर संस्थेचे संचालन व व्यवस्थापन उत्तम पद्धतीने हाताळत आपल्या उत्तम कार्यशैलीचे दर्शन घडविले.सर्व शैक्षणिक संकुलाचे आय.एस.ओ. २१००१-१८ सर्टिफाइड व NAAC 'A' मानांकन करून , गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये विद्यमान चेअरमन व व्हाईस चेअरमन यशस्वी झाले आहेत.
गेल्या ३१ वर्षा पासून अविरतपणे उत्तम व दर्जेदार व्यावसायिक शिक्षण देवून , आज पर्यंत हज़ारो अभियंते घडवण्याची किमया डॉ.जे.जे. मगदुम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, जयसिंगपूर यांनी केली आहे. या महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आज देश- विदेशात मोठ्या पदावर काम करीत आहेत तर काहीनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. महाविद्यालयास आएसओ सर्टिफिकेशन व NAAC ने “ए” ग्रेड चे मानांकन प्राप्त झाले आहे.
स्वायत दर्जा ( Autonomus status) च्या अंतर्गत महाविद्यालयाने Industry ready असा स्वतंत्र अभ्यासक्रम , पारदर्शी परीक्षा पद्धती व गुणांकन पद्धती विकसित केली आहे. सध्याच्या औद्योगिक व्यवसायाचे मागणीनुसार अभियंते घडवणे व त्यांच्या उद्योजकिय अनुभवाकरिता महाविद्यालयाने ६० हून अधिक Industry सोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप व Placement च्या संधी उपलब्ध होणार आहे.तसेच स्टुडंट एक्सचेंज ( student exchange) अंतर्गत नामांकित शासकीय अथवा खाजगी महाविद्यालया मध्ये एक सेमीस्टर शिकण्याची संधी उपलब्ध होत आहे. या स्वायत दर्जा मुळे शासनाच्या आदेशा नुसार नवीन शैक्षणिक धोरण, २०२० नुसार ( National Education Policy) प्रणाली राबवणे सुलभ होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी संधी रुपी पर्वणी उपलब्ध होत आहे. महाविद्यालयात सिव्हिल, ईटीसी, कॉम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजीनियरिंग, इनफर्मेशन टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये बी. टेक ची कोर्सेस तसेच एम.सी.ए.व सिव्हिल इंजीनियरिंग मध्ये एम. टेक. च्या ब्रँच उपलब्ध आहेत.अशीही माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी दिली.
सदर पत्रकार परिषदेस ॲडव्हाझर डॉ. उमेश देशन्नावर, प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील, रजिस्ट्रार श्री. सचिन जाधव , सर्व विभागांचे अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा