Breaking

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

*राजाराम कॉलेज कोल्हापूरचा एन.एस.एस.चा विद्यार्थी श्री.पार्थ संदीप देसाई ठरला सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय स्वयंसेवक*


राज्यस्तरीय एन.एस.एस. सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक विद्यार्थी पुरस्कार प्राप्त श्री. पार्थ संदीप देसाई

*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


कोल्हापूर : श्री पार्थ संदीप देसाई याची राज्यस्तरीय  सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक विद्यार्थी म्हणून निवड झाली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सध्या पार्थ देसाई हा राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथे शिक्षण घेत असून कार्यशील एनएसएस विद्यार्थी म्हणून त्याचे सर्वत्र नावलौकिक आहे.

कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के.यांचे हस्ते पार्थ देसाई याचा सत्कार होत असताना शेजारी संचालक डॉ.तानाजी चौगले

      शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने सन २०२१-२०२२ साठी सर्वोत्कृष्ट एन.एस.एस स्वयंसेवक विद्यार्थी म्हणून श्री पार्थ संदीप देसाई याची निवड करून त्याचा सत्कार मा. कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी.शिर्के यांच्या हस्ते व संचालक डॉ.तानाजी चौगले यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता.

    श्री पार्थ देसाई हा विद्यार्थी "Not Me ! But You" या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे तो सातत्याने समाजासाठी काम करीत आहे. गेल्या चार वर्षात विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी व माणुसकी जपण्याचं काम तो करीत आहे. पार्थ देसाई इत्यादी एनएसएस विद्यार्थी म्हणून कोल्हापुरातील महापूरात, कोरोना महामारी व पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्न यासाठी केलेलं काम कौतुकास्पद आहे. NSS कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सुरज सोनवणे यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली एनएसएसच्या माध्यमातून केंद्र शासन राज्य शासन,विद्यापीठ व सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निश्चित केलेली विविध सामाजिक उपक्रमात तो सक्रिय सहभागी होता. निसर्गाची असलेली आवड यामुळे तो विद्यार्थी दशेपासून वृक्षारोपण करण्यामध्ये आघाडीवर होता. प्रबोधन चळवळीच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो धडपडत असतो. फिट फॉर इंडिया, राष्ट्रीय मतदार नोंदणी व जनजागृती, माणुसकीची भिंत, विविध सामाजिक प्रश्नासाठी पुढाकार घेणे व स्वच्छता अभियानामधील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.

     पार्थ देसाई एनएसएच्या राष्ट्रीय, राज्यस्तरीय व विद्यापीठ शिबिरामध्ये सहभागी होता. नॅशनल बेस्ट झोन प्री आर.डी. कॅम्प, नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प, स्टेट लेवल आरडी कॅम्प, आव्हान कॅम्प व स्थानिक शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचे उत्तम नेतृत्व करीत आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्व व कर्तुत्वाने उत्तम कामगिरी केली आहे. हुशार विद्यार्थी, उत्तम वाणी, देखणे व्यक्तिमत्व व सामाजिक संवेदनशीलता हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे गुणवैशिष्ट्य आहेत.राज्यस्तरीय युथ पार्लमेंट मध्ये सहभागी होऊन यीन चीफ मिनिस्टर महाराष्ट्राचा बनलेला होता. त्याचे प्रत्येक काम जनसेवेसाठी असल्याचे दिसून येते.

संचालक प्रा.डॉ. तानाजी चौगले, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

    कार्यशील व दूरदृष्टी असलेले रासयो, संचालक डॉ.तानाजी चौगले यांनी पार्थच्या वैयक्तिक बायोडाटाचा अभ्यास करून त्याला कसे यश मिळेल याबाबत त्यांनी विशेष अभ्यास केला. त्याला यश लाभणार याबद्दल डॉ. चौगुले यांना खात्री होती.डॉ. चौगले यांच्यामुळे पार्थला काम करण्यासाठी स्फूर्ती व बळ मिळाले.

प्रा.डॉ.सुरज सोनवणे, कार्यक्रम अधिकारी, राजाराम कॉलेज कोल्हापूर

      कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सुरज सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले. डॉ. सोनवणे यांनी एन एस एस कार्यक्रम अधिकारी म्हणून आपली उत्तम जबाबदारी पार पाडताना पार्थ देसाई यास वेळोवेळी मार्गदर्शन, विशेष सहकार्य व उत्तम सुसंवादाच्या माध्यमातून त्याला प्रेरणा देत होते. तसेच त्यांचे उत्तम नेतृत्व, कर्तुत्व व सामाजिक बांधिलकीचे अनुकरण करीत पार्थ देसाईने हे यश संपादन केले. डॉ. सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेऊन त्याला वेळोवेळी सहकार्य केले. अर्थात गुरु म्हणून विशेष कामगिरी पार पाडली. त्यांचे ही विशेष कौतुक सर्वत्र होत आहे.

       जय हिंद न्यूज नेटवर्क बोलताना पार्थ देसाई म्हणाले, कुलगुरू प्रा.डॉ. डी.टी.शिर्के, प्र. कुलगुरू प्रा.डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव प्रा.डॉ. व्ही.एन.शिंदे यांच्याकडून मला  प्रेरणा मिळाली. कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. तसेच कॉलेजचे प्राचार्य, प्रा.डॉ.वाय.सी.आत्तार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.त्याचबरोबर या यशामध्ये आई-वडिलांनी दिलेली सामाजिक कार्याची मुभा व साथ तसेच इतर घटकांनी केलेलं उत्तम सहकार्य यामुळेच मला हे यश मिळाले आहे.

     पार्थ देसाई पुढे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून काम करण्याची प्रेरणा व माझ्या कृतीमध्ये संवेदनशीलता निर्माण केली.याही पुढे असंच कार्य सुरू ठेवणार आहे.

     पार्थ देसाई यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा