![]() |
कु. प्रांजली जाधव (प्रथम) आणि कु.भाग्यश्री शिंदे (पाचव्या स्थानी) |
*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : शिवाजी विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी अंतिम वर्षाच्या सन 2022-23 परीक्षेत डॉ. जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर च्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत अनुक्रमे प्रथम व पाचवा क्रमांक मिळवून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
शिवाजी विद्यापीठ मार्फत घेण्यात आलेल्या सिव्हिल अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाले आहे. यामध्ये जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजचे सिव्हिल विभागातील कु. प्रांजली जाधव हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच कु. भाग्यश्री शिंदे हिने पाचवा क्रमांक मिळवून टॉप टेन मध्ये येण्याचा बहुमान पटकावला आहे.
विद्यापीठ परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे घवघवीत यश अतुलनीय आहे असे गौरवोद्गार डॉ. जे जे मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विजयराज मगदूम यांनी काढले. तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. सोनाली मगदूम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे .महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुनील आडमुठे , ॲडव्हायझर डॉ. उमेश देशन्नावर , प्राचार्या डॉ. शुभांगी पाटी, डीन अकॅडमी प्रा. अमितकुमार साजणे, विभागप्रमुख डॉ. जे .एस. लंबे तसेच सर्व शिक्षक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा