![]() |
कृष्णा घाट सजला लक्ष लक्ष दिव्यांनी |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
नृसिंहवाडी : कार्तिक पौर्णिमा रविवारच्या सुट्टीचे अवचित्य साधून अनेक दत्त भक्तांनी कार्तिक स्नानाच्या लाभ घेऊन येथील कृष्णा नदीच्या काठावर असलेला घाट लाखो दिप लावून उजळून टाकला आहे.येथील कृष्णा नदीच्या घाटावर आज दुपारी 4 पासून सुरू झालेल्या कार्तिक (त्रिपुरारी) पौर्णिमेनिमित्त लक्ष लक्ष दिव्यांनी कृष्णा घाट उजाळला. घाटावर अनेक दीप लावण्यासाठी महिलांनी दिवसभरात गर्दी केली होती दिवसभर त्रिपुरारी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दत्त मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी 3 वाजून 53 मिनिटांनी त्रिपुरारी पौर्णिमेला प्रारंभ झाला.
सकाळपासूनच भाविकांची गर्दी लक्षणीय होती. सांगली, कोल्हापुर, इचलकरंजी, पुणे, मुंबई यास अनेक ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी आज मनोभावे दत्त दर्शन घेतले. आज पहाटे पाच वाजता नित्यनेमाने दत्त मंदिरात काकड आरती करण्यात आले.त्यानंतर 8 ते 12 यावेळेत ब्रह्मवृंदांमार्फत भक्तिभावाने अभिषेक, महापूजा केली. दुपारी 12.30 वाजता श्रीच्या पादुकांची षोडशोपचार महापूजा केली. 3 वाजता पवमान पंचसुक्ताचे पठण केले. दत्त देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या सोयीसाठी मुखदर्शनाबरोबरच स्वतंत्र तीन प्रकारच्या दर्शनाची व्यवस्था केली होती. अनेक भाविक कृष्णा नदीत स्नान करून दत्त दर्शन घेत होते. रात्री 7 ते 10 या वेळेत महिलांनी व भक्त वर्गानी कृष्णा घाटावर अनेक दीप लावल्यामुळे हा कृष्णा घाट लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून गेला.. अनेक भक्त कुरुंदवाड येथील घाटावर कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा