Breaking

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०२३

*जयसिंगपूरात संविधान दिन कार्यक्रम निमित्ताने मोफत जिलेबी वाटप उपक्रमात एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*


संविधान दिनानिमित्त जिलेबी वाटप करताना एनएसएसचे विद्यार्थी


*प्रथमेश कोळी : विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : २६ नोव्हेंबर, २०२३ रोजी जयसिंगपूर नगरपरिषद व साप्ताहिक संविधानचा आवाज यांनी आयोजित केलेल्या संविधान दिन कार्यक्रमात एन.एस.एसचे  विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.


    साप्ताहिक संविधानाचा आवाज यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून नागरिकांसाठी मोफत जिलेबी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन नागरिकांना जिलेबी वाटपाचा कार्य केले. त्याचबरोबर तेथील स्वच्छता करून संविधान दिनाच्या निमित्ताने स्वच्छता कार्यक्रम राबविला.

       साप्ताहिक संविधानचा आवाज चे संपादक अब्दुलभाई बागवान यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रभाकर माने व प्रा.डॉ. खंडेराव खळदकर उपस्थित होते. जयसिंगपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.डॉ.टी.एम. चौगले व जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य प्रा.डॉ. सुरत मांजरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा