*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*
जयसिंगपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे - पाटील यांचा राज्यव्यापी दौरा सुरू आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने शुक्रवार दि. १७ रोजी जयसिंगपूर येथे मनोज जरांगे-पाटील यांची भव्य सभा होणार आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांची होणारी ही सभा विक्रमी व यशस्वी होणेसाठी सर्व समाजबांधव व मराठा आरक्षणाला पाठींबा देणारे इतर समाज बांधवांनी शुक्रवारी दुपारी २ वाजता विक्रमसिंह क्रीडांगण , जुन्या नगरपरिषद,जयसिंगपूर इमारतीजवळ, सांगली- कोल्हापूर रोड, जयसिंगपूर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन शिरोळ तालुका सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा