भोलू शर्मा : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील शेडशाळ माळभाग येथे स्टेरिंग प्रॉब्लेममुळे झालेल्या अपघातात ४७ प्रवासी बसमध्ये अडकून अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना घटल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान जखमीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते.
अधिकृत सूत्राकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुरुंदवाड आगाराहून सदरची बस गणेशवाडीला जात होती. अचानक समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देताना स्टेरिंगमध्ये प्रॉब्लेम आल्याने चालकाचा ताबा सुटला व बस थेट लागत असलेल्या चरीमध्ये गेल्याची घटनेची माहिती समोर आली आहे.दरम्यान, बसमध्ये सुमारे ४७ प्रवासी अडकले असून अनेक प्रवासी तसेच विद्यार्थी जखमी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तातडीने सर्वांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सदरची घटना समजतात कुरुंदवाड आगार विभागाचे अधिकारी तसेच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा