Breaking

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

दीप पब्लिक स्कूलमध्ये अनोखा आठवडी बाजार

 





     विद्यार्थ्यांना गणितिय क्रियांचा व्यवहार ज्ञानामध्ये उपयोग करता यावा,यातूनच मुलांना आनंद मिळावा.बाजार म्हणजे काय असतो ॽ तेथे भाजी पाल्यांची विक्री कशी केली जाते ॽबाजारात पैशांचें व्यवहार कसे होतात ॽ ग्राहकांना भाजीची विक्री कशी करायची ॽ जीवनात विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळावे ,हे उद्दिष्ट समोर ठेवून दीप ग्राम मध्ये आठवडी बाजार भरविला होता .



      या कार्यक्रमाची सुरुवात नृत्य व गायनाने करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ .श्री. अण्णासाहेब पाटील तसेच सौ.श्री. अमित पाटील व कॅम्पस डॅरेक्टर श्री संदिप रायणावर सर यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक शाळेच्या प्रधानाचार्या सौ. नमिता जैन मॅम व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या म्हशाळकर मॅम या होत्या,तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजयराज मगदूम सर आणि उपाध्याक्षा ॲड. डॉ. सौ. सोनाली मगदूम मॅम यांनी दिप ग्रामला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा आठवडी बाजार संपन्न झाला.


                     या आठवडी बाजारात पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि भाजीची खरेदी-विक्री सुरू होती विद्यार्थी उत्साहात भाजी विकत होते पालक आनंदात भाजी विकत घेत होते हा आनंदोत्सव मन भारावून टाकणारे होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा