Breaking

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

*विकसित भारत @47च्या उभारणीत देशातील युवक सर्वस्वी जबाबदार असणार : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी*

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांना ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधताना


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


जयसिंगपूर : अनेकांत एज्युकेशन सोसायटी जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मध्ये 'विकसित भारत@47 युवकांचा आवाज' हा कार्यक्रम ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संपन्न झाला.

    या कार्यक्रमांतर्गत देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे युवकांना संबोधित केले. माननीय पंतप्रधान यांनी आपल्या अभिभाषणातून देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये राष्ट्रप्रेम व राष्ट्र चेतना जागृत केल्या.  सक्षम भारताच्या उभारण्यात विद्यार्थ्यांची भूमिका काय या विषयाच्या अनुषंगाने सकारात्मक मांडणी करून उपस्थिती युवकांना प्रोत्साहित केले.विकसित भारत बनवण्याची सर्वस्वी जबाबदारी युवकांच्यावर येऊन ठेपली आहे. यासाठी मुळात विकसित भारताच्या दिशेने सकारात्मक मार्ग तयार झाला आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आज पासून २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून विविध क्षेत्राच्या माध्यमातून देशाची सक्षम बांधणी करण्यासाठी कटीबद्ध राहावे.

      ऑनलाइन कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या कार्यक्रमानंतर केमिस्ट्री विभाग प्रमुख प्रा.डॉ.बी.एम.सरगर मार्गदर्शन करताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यंत देश विकसित करण्यासाठी अनेकमार्ग सुचवले आहेत. यासाठी आपण सर्वांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. भविष्यातील भारत कसा असला पाहिजे याचं उत्तम व्हिजीन माननीय पंतप्रधान यांनी अभिभाषणातून स्पष्ट केले आहे.

      सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्राचार्य डॉ. सुरत मांजरे  यांनी प्रोत्साहित करून मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.एन.पी.सावंत , डॉ. आर. डी.माने, डॉ.एम.एस. सूर्यवंशी,डॉ.जे.बी पताडे, ग्रंथपाल प्रा.अमर कुलकर्णी,प्रा. कबीर कुंभार, प्रा. प्रीतम पाटील, प्रा. अक्षय माने, प्रा. सुरज चौगुले, प्रा. मेहबूब मुजावर,प्रा. माधुरी कोळी, प्रा. कांबळे व प्रा.जमादार व एन.एस. एस.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






        या कार्यक्रमासाठी उत्तम मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक तानाजी चौगुले केले यांनी केले.सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन एनएसएस विभागाच्या वतीने कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने व डॉ. खंडेराव खळदकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा