Breaking

बुधवार, १३ डिसेंबर, २०२३

*इचलकरंजीची सुकन्या कु. अपूर्वा तेली आयटीआय शिल्प निदेशक पदासाठी राज्यात मुलींमध्ये सर्वप्रथम*

 

*इचलकरंजीची सुकन्या कु. अपूर्वा तेली आयटीआय शिल्प निदेशक पदासाठी राज्यात मुलींमध्ये सर्वप्रथम* 


*प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक*


    कोल्हापूर : इचलकरंजी येथील कु. अपूर्वा सदाशिव तेली व्यवसाय 'शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र, राज्य मुंबई' कडून क्राफ्ट इन्स्ट्रक्टर-शिल्पनिदेशक या पदासाठी घेतलेल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

    या पदाची पूर्व परीक्षा सप्टेंबर 2022 रोजी व मुख्य परीक्षा जून 2023 रोजी झाली होती. राज्यात एकूण 55 हजार इंजिनिअर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. अपूर्वा, टूल अँड डाय मेकर डाईज अँड मोल्ड या ट्रेड साठी मुलींमध्ये महाराष्ट्र राज्यात निवड यादीत सर्वप्रथम आली आहे अपूर्वा हिचे मूळ गाव घुणकी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर असून तिचे 12 वी पर्यंतचे शिक्षण गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी जि. कोल्हापूर येथे झाले आहे. गोविंदराव कॉलेजचे पर्यवेक्षक प्रा. एस. एस. तेली यांची ती सुकन्या असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा